शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

माणूस म्हणून जगण्याचा आमचा हक्क नाकारू नका

By admin | Updated: October 3, 2016 04:28 IST

मी माझ्या उमेदीच्या वयात रस्त्यावरचे झेब्रा क्रॉसिंग रंगवून पैसे कमावले, आणि शिक्षण पूर्ण केले.

पुणे : मी माझ्या उमेदीच्या वयात रस्त्यावरचे झेब्रा क्रॉसिंग रंगवून पैसे कमावले, आणि शिक्षण पूर्ण केले. आपण कुणाला नको आहोत, ही जाणीव अतिशय न्यूनगंड निर्माण करणारी असते. उच्चभ्रू वृत्तीला छेद देणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नसतो का? प्रत्येक गोष्ट आम्हाला भांडून का मिळवावी लागते? माणसे म्हणून जगण्याचा आमचा हक्क नाकारु नका, असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते, नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी येथे काढले.हॅबिटॅट फोरम (इनहॅप) या संस्थेने पुणे पालिकेच्या सहकार्याने ‘संघर्ष आणि सामर्थ्य : शहरातील श्रमजिवींच्या कथा’ हे पुस्तक तयार केले आहे. त्याचे प्रकाशन पाटेकर यांच्या हस्ते झाले. हमाल पंचायत, अंगणवाडी कर्मचारी सभा, जाणीव संघटना, कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, रिक्षा पंचायत, दगडखाण कामगार विकास परिषद अशा सहा संघटनांच्या सदस्यांच्या संघर्षाची कथा या पुस्तकात आहे.जात नावाची गोष्टच अस्तित्वात नसते. आपण आपली जात निर्माण करायची असते, ती आपल्या मनगटात असते, असे सांगून नाना म्हणाले, सध्या सिग्नलजवळ भिक मागणाऱ्या मुलांना मी मोटारीत घेतो. दुसरा सिग्नल येईपर्यंत त्यांच्या या अवस्थेमागचं कारण समजावून घेतो. आपण आपली दारे कधी उघडणार आहोत? शहरामध्ये जगण्यासाठी येणाऱ्या श्रमिकांना दर्प घाणीचा नसतो, तो श्रमांचा असतो. (प्रतिनिधी)>पाक कलाकारांंना सध्या काम नकोसर्वात प्रथम देश महत्त्वाचा त्यानंतर आम्ही कलाकार. देशापुढे आमची किंमत शून्य आहे. आपल्या देशाचे जवान हेच खरे हीरो आहेत. त्यांच्याप्रती कोणाला आदर नसेल तर त्यांचा आपण आदर करू नये. सीमेवर युद्ध नसते, तेव्हा तेथे एकमेकांत भाईचारा असतो. युद्ध असल्यावर एकमेकांना गोळ्या माराव्या लागतात. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना आत्ता काम देऊ नये. परिस्थिती निवळल्यावर त्यांनी पुन्हा येण्याबाबतचा निर्णय सरकारचा असेल, असे बजावून पाटेकर यांनी आम्ही बोलतो त्यावर लक्ष देवू नका. तसेच, ज्यांची लायकी नाही अशांना महत्त्वही देऊ नका, अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.