शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पीएसआयच्या खात्यांतर्गत परीक्षा रद्द करू नका; अंमलदारांचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 07:18 IST

‘फेसबुक लाइव्ह’मध्ये थेट पोलीस महासंचालकांकडे व्यक्त केल्या भावना

मुंबई : पोलीस उपनिरीक्षक पदाच्या विभागीय परीक्षा रद्द करण्याच्या प्रस्तावित निर्णयाला खात्यातील पदवीधर कॉन्स्टेबलकडून उघडपणे विरोध वाढत आहे. त्या रद्द करू नका, अशी विनंती थेट प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे  रविवारी ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून अनेकांनी केली. पांडे मात्र   त्याबाबत आग्रही राहिले. हा निर्णय सर्व अंमलदारांसाठी उपयुक्त ठरेल, असे ते सांगत होते.  संजय पांडे हे दर रविवारी सोशल मीडियावरून आपण केलेल्या कामाची माहिती देत आहेत. रविवारी त्यांनी थेट  फेसबुक लाइव्ह माध्यमातून  पोलिसांशी संपर्क साधला. कॉमेंट बॉक्समध्ये ते आपल्या समस्या मांडीत होते. त्यावर पांडे यांनी उत्तरे दिली.  त्यात सहभागी असणाऱ्यांमध्ये बहुतांश अंमलदारच होते.  कॉन्स्टेबलची  एमपीएससीकडून होणारी परीक्षा रद्द करून त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा प्रस्ताव बनविला आहे. मात्र  गुणवत्तेच्या आधारावर परीक्षा देऊन अधिकारी होऊ इच्छिणारे कॉन्स्टेबल त्याविरुद्ध मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व आमदारांकडे निवेदन देत आहेत. पांडेंच्या आजच्या फेसबुक लाइव्हवर काहींनी धाडस दाखवून त्याबाबत विचारणा केली. २४ तास आराम देण्याचे नियोजनया वेळी एका प्रश्नावर पांडे यांनी मुख्यालयाकडून २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेतील सेवाज्येष्ठतेची यादी आता थांबविली जाणार असल्याचे स्पष्ट केले. अंमलदाराने १२ तास ड्यूटी केल्यानंतर २४ तास त्याला आराम देण्याच्या दृष्टीने ड्यूटीचे नियोजन करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. एसआरपी जवानांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.