मुंबई : ‘शांतता क्षेत्रा’त मोडत असलेल्या शिवाजी पार्कवर भविष्यात ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी देणार नाही, असे आश्वासन देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्रा’त येत असतानाही रथयात्रेदरम्यान या ठिकाणी ध्वनिक्षेपक लावण्यास शिवाजी पार्क पोलिसांनी परवानगी दिल्याने विकॉम ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली. गेल्या सुनावणीत हायकोर्टने संबंधित पोलिसांवर काय कारवाई करणार? अशी विचारणा केली होती. शिवाजी पार्क पोलिसांनी खंडपीठाची बिनशर्त माफी मागितली. मात्र नुसत्या माफीवर उच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)
शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देऊ नका
By admin | Updated: January 24, 2017 04:39 IST