शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?

By admin | Updated: July 17, 2017 02:55 IST

आणीबाणीवर आधारित ‘इंदू सरकार’ चित्रपटाला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या विरोधाला दिग्दर्शक मधुर भांडारकर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर- आणीबाणीवर आधारित ‘इंदू सरकार’ चित्रपटाला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या विरोधाला दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?’ असा थेट सवाल त्यांनी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केला आहे."इंदू सरकार" चित्रपटाला काँग्रेसचा विरोध आता आणखी तीव्र होऊ लागला आहे. पुण्यापाठोपाठ रविवारी नागपुरातही चित्रपटविरोधात काँग्रेसने आंदोलन केल्याने भांडारकर यांना दोन वेगवेगळया ठिकाणी आयोजित कलेली पत्रकार परिषद रद्द करावी लागली. या प्रकारामुळे संतापलेल्या भांडारकर यांनी राहुल गांधींना टिष्ट्वट करून ‘या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का?’ असा सवाल केला. चित्रपट न पाहताच गोंधळ घालणे आणि बोलण्याची संधी न देणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. हा चित्रपट काल्पनिक असून कॉंग्रेसची भूमिका अयोग्य आहे, असे भांडारकर म्हणाले. हा चित्रपट कुठल्याही राजकीय पक्षाने ‘स्पॉन्सर’ केला नाही. जर असे असते तर मी १०० टक्के चित्रपट पूर्णपणे आणीबाणीवरच काढला असता आणि निवडणुकांच्या वेळी प्रदर्शित केला असता, असे भांडारकर यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांनी बोलताना सांगितले.‘सेन्सॉर’ने या चित्रपटात १७ ‘कट’ करण्यास सांगितले आहे. मात्र माझी त्यासाठी तयारी नाही. याबाबत कायदेशीर दाद मागण्यात येईल व ‘ट्रिब्युनल’मध्ये जाण्यास तयार आहोत. एखाद्या लेखकाला पुस्तकात काय लिहिले आहे, असे विचारत नाहीत. मग चित्रपटाबाबतच का विचारणा होते, असा सवालही भांडारकर यांनी उपस्थित केला.हा चित्रपट ७० टक्के काल्पनिक असून, फक्त ३० टक्केच वस्तुस्थितीवर आधारित आहे. अशातही विरोध होत असेल, तर ही माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. माझे तोंड काळे करून किंवा अंगावर शाई फेकून तुम्ही इतिहास बदलू शकणार नाही.- मधुर भांडारकर, दिग्दर्शक