शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
3
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
4
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
5
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
6
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
7
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
8
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
9
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
10
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
11
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
12
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
13
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
14
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
15
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
16
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
17
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
18
अत्यंत प्रतिकूल काळात सनातन वैदिक हिंदू धर्माचे रक्षण करणारे आद्य शंकराचार्य यांची जयंती; वाचा कार्य!
19
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

डीएसके आणखी गोत्यात; पुणे, मुंबईनंतर कोल्हापुरातही गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 11:37 AM

पुण्यातील प्रसिध्द डीएसके ग्रुपचे मालक  दीपक सखाराम कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

कोल्हापूर : पुण्यातील प्रसिध्द डीएसके ग्रुपचे मालक  दीपक सखाराम कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाने जरी त्यांना मंगळवारपर्यंत दिलासा दिला असला तरी त्यांच्याविरोधात कोल्हापुरातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रविवारी फिर्याद देण्यासाठी पन्नास गुंतवणूकदार थेट राजारामपूरी पोलीस ठाण्यात आले आहेत. कुलकर्णी दाम्पत्याच्या विरोधात तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ठेवीदार असोसिएशनचे अध्यक्ष बी. डी. किल्लेदार हे स्वत: फिर्यादी असून त्यांचा जबाब पोलीस नोंदवित आहेत. कोल्हापूर शहरासह, ग्रामीण भागातील शेतकरी, सेवानिवृत्त शिक्षक, व्यापारी व इतर व्यवसायातील सहाशे गुंतवणूकदारांनी १ लाखांपासून ते १० कोटींपर्यंत अशा सुमारे दोनशे कोटींच्या ठेवी ‘डीएसके’मध्ये ठेवल्या आहेत. कोल्हापूरातील ही सर्वांत मोठी फसवणूक आहे.

डीएसके दाम्पत्याला मंगळवारपर्यंत दिलासा-

गुंतवणकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांना सत्र न्यायालयाने मंगळवारपर्यंत दिलासा दिला आहे़ सरकार पक्षाने बाजू मांडण्यासाठी मुदत देण्याची विनंती केल्याने विशेष न्यायाधीश जे़ टी़ उत्पात यांनी अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी येत्या मंगळवारी ठेवली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके दांपत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर शुक्रवारी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी शिवाजीनगर न्यायालयातील सत्र न्यायालयात धाव घेतली होती़ त्यावर शनिवारी सुनावणी झाली़पैसे वसूल करायची ही जागा नाही़ कस्टडीत टाकून पैसे मिळू शकणार नाहीत; ते बाहेर राहिले तर पैसे गोळा करु शकतात़ अशा आशयाच्या उच्च न्यायालयाच्या एका निवाड्याचा दाखलाही त्यांनी दिला़ त्यानंतर सहायक सरकारी वकील सुनील हांडे यांनी सरकार पक्षाला बाजू मांडण्यासाठी मुदत द्यावी अशी विनंती केली़९४५ तक्रारी-सुटी असल्याने शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात तक्रार देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती़ ३४५ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातील रक्कम २५ कोटी ६५ लाख रुपये इतकी आहे़ आतापर्यंत ९४५ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत़ मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.७० बँकांमधील खाती गोठवलीडीएसके उद्योगसमूहाच्या विविध बँकांमधील सुमारे ७० खाती गोठविली असून, त्यासाठी इंडियन बँक असोशिएशनला पत्र देण्यात आले आहे़ याशिवाय ईडी आणि सेबीकडेही अर्ज करण्यात आला आहे़ तसेच डीएसके उद्योगसमूहाच्या मालकीच्या जमिनीचे व्यवहार परस्पर होऊ नये, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने नोंदणी महानिरीक्षकांनाही पत्र पाठविले आहे़

 

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी