शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

डीजे, आवाज वाढवू नको...

By admin | Updated: August 30, 2016 02:12 IST

‘आवाज वाढव डीजे’ म्हणत तीव्र क्षमतेच्या ध्वनिक्षेपकासमोर थिरकणे तुमच्या जिवावर बेतू शकते. आवाजाच्या दणक्यामुळे शुद्ध हरपण्याबरोबरच जीव जाण्याचा धोका

विशाल शिर्के,  पुणे‘आवाज वाढव डीजे’ म्हणत तीव्र क्षमतेच्या ध्वनिक्षेपकासमोर थिरकणे तुमच्या जिवावर बेतू शकते. आवाजाच्या दणक्यामुळे शुद्ध हरपण्याबरोबरच जीव जाण्याचा धोका असल्याचे दहीहंडीतील एका घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात तरी आपण यापासून धडा घेणार की नाही, असा प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवा. दहीहंडीत डीजेच्या कानठळ्या बसविणाऱ्या डीजेसमोर थिरकणाऱ्या एका मंडळातील दोन कार्यकर्त्यांची शुद्ध हरपल्याची घटना धनकवडी गावठाण येथे घडली. या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढल्याने त्यांना एक दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले. इतकेच काय, तर त्यांच्या हृदयाचे ठोके पूर्ववत होण्यास तब्बल १२ तास लागल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दहीहंडी, गणेशोत्सव व नवरात्रात कर्णकर्कश डीजेच्या तालावर नाचण्याचा प्रघात गेल्या काही वर्षांत पडला आहे. अत्याधुनिक पद्धतीचे ध्वनिवर्धक लावून मोठ्या प्रमाणावर आवाज सोडण्याची चढाओढ मंडळांमध्ये लागल्याचे दिसून येते. ही दहीहंडीदेखील त्याला अपवाद ठरली नाही. शहर मध्य वस्ती असो की उपनगरातील भाग; सार्वजनिक मंडळे २०-२० फुटांच्या अंतरावर दिसून येतात. त्यामुळे हा आवाजाचा दणका कितीतरी पटींनी वाढतो. मात्र, अशा ध्वनिवर्धकाचा आवाज जिवावरदेखील बेतू शकतो, याचे उदाहरण समोर आले आहे. धनकवडी गावठाणातील एका मंडळातील दोन २१ व २२ वर्षांच्या कार्यकर्त्यांवर डीजेच्या आवाजामुळे शुद्ध हरपण्याची वेळ आली. धनकवडी गावठाणातील सह्याद्रीनगर परिसरात जवळजवळ असलेल्या दोन मंडळांत ध्वनिक्षेपकाची चढाओढ चालू होती. त्या गोंगाटात ठराविक अंतराने दोन जणांची शुद्ध हरपली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले तेव्हा, त्यांच्या हृदयाचे ठोके वाढल्याचे लक्षात आले. तसेच, त्यांचा रक्तदाबदेखील व्यवस्थित येत असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. त्यांचे ठोके सामान्य होण्यासाठी तब्बल १२ तास लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले.याबाबत संबंधित तरुण व त्यांच्या पालकांशी संपर्क साधला असता, त्यांनी स्वत:चे व मंडळाचे नाव छापण्यास नकार दिला. यांतील एका तरुणाने ध्वनिवर्धकामुळे त्रास झाल्याची शक्यता मान्य केली; मात्र त्याला पूर्वी फिट्सचा त्रास होत होता. तो मधल्या काळात बंद झाला होता. त्यामुळे पुन्हा तसाच त्रास झाल्याची शक्यता व्यक्त केली. तर, दुसऱ्या एका तरुणाने दिवसभर काहीही न खाता मंडळात काम केल्याने व त्यानंतर तसेच डीजेच्या तालावर थिरकल्याने त्रास झाल्याचे सांगितले. याशिवाय, १५ दिवसांपूर्वी डेंगी झाल्याने अशक्त असल्याचेदेखील त्याने सांगितले. 1दणक्यातील आवाजामुळे, विशेषत: डीजेतील ‘हुपर’मुळे हृदय धडधडते. त्यामुळे हृदयाची पूर्णत: उघडझाप होत नाही. ते केवळ फडफडल्यासारखे करते. परिणामी मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्याने मेंदूला आॅक्सिजनची कमतरता निर्माण होते. त्यामुळेच शुद्ध हरपते. 2अशा परिस्थितीत रुग्णावर चोवीस तास लक्ष ठेवावे लागते. जर हृदयाचे ठोके पूर्ववत न झाल्यास जीवावरदेखील बेतू शकते, असे डॉ. प्रवीण दरग म्हणाले.आवाजाची तीव्रता व त्याचा कानावर पडणारा कालावधी महत्त्वाचा असतो. तसेच एखादी व्यक्ती जर आवाजाप्रती संवेदनशील असेल, तर त्या व्यक्तीला तुलनेने कमी तीव्रतेच्या आवाजानेदेखील कानाच्या पडद्याला दुखापत होऊ शकते. साधारण शंभर डेसिबल व त्यापेक्षा अधिकचा आवाज निश्चित दुखापत करणारा असतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कानावर दीडशे डेसिबलचा आवाज दोन मिनिटे पडल्यास त्याला हमखास त्रास होऊ शकतो. जर आपल्याला तीव्र आवाजातील डीजे वाजवायचाच असेल, तर किमान दोन गाण्यांनंतर पंधरा ते वीस मिनिटांची विश्रांती घेण्याची दक्षता घेतली पाहिजे. - रवींद्र सरदेसाई, कान, नाक, घसातज्ज्ञ