शहरं
Join us  
Trending Stories
1
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
2
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
3
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
5
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
6
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
7
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
8
स्मिता पाटील यांच्यासोबतच्या तुलनेवर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया, म्हणाली, "बाईला संघर्ष आजही..."
9
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
10
मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही राधिका आपटे? म्हणाली, "मला काही काळापासून..."
11
मुलाने कपाटातून आईचा महागडा नेकलेस चोरला, तोडून शाळेतील विद्यार्थिनींना वाटला, त्यानंतर...
12
IND vs SA T20I : संजूच्या जागी गिल का? सलामी संदर्भात कॅप्टन सूर्यानं स्पष्टीकरण दिलं, पण...
13
Jara Hatke: रात्री झोपताना एक पाय ब्लँकेटमधून बाहेर काढण्याची सवय आहे? मग 'हे' वाचाच!
14
IND vs SA: विराटची शतकं, रोहितची फटकेबाजी, संघाने मालिकाही जिंकली; पण आता आली वाईट बातमी
15
बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ८०० अंक तर निफ्टी २६,००० च्या खाली; 'या' ६ कारणांमुळे मोठी घसरण
16
चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा
17
Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट!
18
"माझ्या नवऱ्याने गर्लफ्रेंडसाठी मला..."; बायकोला जीवे मारण्याची धमकी, ढसाढसा रडत पोलिसांत धाव
19
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
20
हायस्पीड इंटरनेट! भारतात Starlink चे सब्सक्रिप्शन किती रुपयांना मिळेल? कंपनीने जाहीर केली किंमत
Daily Top 2Weekly Top 5

Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...

By हेमंत बावकर | Updated: October 24, 2025 10:26 IST

Ladki Bahin Yojana e-KYC update: लाडक्या बहिणीच्या ई केवायसीसाठी वेबसाईटवर खूप ट्रॅफिक असल्याचे मेसेज दाखविले जात होते. यामुळे अनेकींना दिवस-दिवस प्रयत्न करूनही ई केवायसी काही करता आलेली नाही.

- हेमंत बावकर

'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) साठी आता राज्यातील महिलांना ई केवायसी करणे गरजेचे करण्यात आले आहे. ही ई केवायसी करताना महिलांसह त्यांना ई केवायसी करून देणाऱ्यांची पार दमछाक होऊन जात आहे. काही दिवसांपूर्वी सातपुडा पर्वत चढून लाडकी बहीण ई केवायसीसाठी रेंज घेत असल्याचे फोटो समोर आले होते. तर कोणाला आधारचा ओटीपी आला तर वेबसाईट पुढे जात नाही, अनेकदा तर ओटीपीच येत नाही अशा अनेक समस्या येत होत्या. 

लाडक्या बहिणीच्या ई केवायसीसाठी वेबसाईटवर खूप ट्रॅफिक असल्याचे मेसेज दाखविले जात होते. यामुळे अनेकींना दिवस-दिवस प्रयत्न करूनही ई केवायसी काही करता आलेली नाही. यासाठी मध्यरात्री २ ते पहाटे ४-५ वाजेपर्यंतची वेळ योग्य असल्याचे सांगितले जात होते. आता या लाडक्या बहिणी एवढ्या रात्री कुठे सातपुडा पर्वतावर रेंज घेण्यासाठी जाऊ शकतात, इतर भागातील महिला दिवसभर काम करून रात्री ई केवायसी करत बसणे थोडे कठीणच होते. 

परंतू, दिवाळीचा हा काळ ई केवायसीसाठी खूप चांगला होता, असे समोर आले आहे. दिवाळीत सारेच सणासुदीत, फराळ बनविण्यात आणि तयारी करण्यात व्यस्त होते, यामुळे या काळात लगेचच ईकेवायसी होत होती. एका व्यक्तीने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर घरातल्या आणि पाहुण्या रावळ्यांच्या लाडक्या बहिणींच्या ई केवायसी करून टाकल्याचे सांगितले. 

दिवाळीत महिला आणि पुरुष सारेच बिझी होते. कोणी प्रवासात होते, कोणी नातलगांकडे गेले होते. दिवाळीच्या या काळात सारेच फटाके फोडण्यात, फराळ खाण्यात व्यस्त होते. लक्ष्मीपुजन, धनत्रयोदशी, पाडव्याच्या पुजेत व्यस्त होते. लाडक्या बहिणी यानंतर भाऊबीजेच्या तयारीत होत्या. यामुळे सर्व्हरवरील लोड खूप कमी होता. याचाच फायदा झाल्याचे या तरुणाने सांगितले. समस्या आलीच नाही असे नाही, एक दोनदा ओटीपी आला परंतू तो चुकीचा असल्याचे, एक्स्पायर असल्याचा वेबसाईटवर मेसेज आला. परंतू, पुन्हा प्रयत्न करताच पुढील प्रोसेस होत होती, असे या तरुणाने सांगितले. सुरुवातीला घरातल्यांचे होत असल्याचे पाहून या तरुणाने पाहुण्यांमधील लाडक्या बहिणींचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही फोन करून आधार कार्ड, ओटीपी मागवून घेत त्यांचेही ई केवायसी करून दिले. प्रत्येक ई केवायसीसाठी सरासरी १० मिनिटे वेळ लागल्याचे या तरुणाने सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali: Best time for Ladki Bahin e-KYC; man helps many.

Web Summary : Diwali proved ideal for Ladki Bahin Yojana e-KYC due to less website traffic. One individual successfully completed e-KYC for family and relatives, capitalizing on festive distractions and lower server load. He faced few OTP issues but quickly resolved them.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाDiwaliदिवाळी २०२५