रजनीकांत कदम -- कुडाळ--जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने काढून घेतल्याने या शेतकऱ्यांचे ऐन दिवाळीतच दिवाळे निघाले आहे. तरी महामागाईच्या भस्मासूरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापणीला आलेले भात पाऊस पडल्याने रानातच आडवे झाले. तर काही ठिाकाणी कापलेले भातपिक भिजून खराब झाले आहे. सलग तीन-चार दिवस पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भातशेतीमध्ये पाणी साचले. पिकलेले आणि कापायला आलेले भाताचे पीक अगोदरच लोंबकळत होते. पण या पावसामुळे व पावसासोबतच्या वाऱ्यामुळे शेतात पडून पावसाच्या पाण्यात डुंबले आहे. त्यामुळे ते भात सर्रास खराब झाले. काही ठिकाणी भिजलेले हे भात काळे पडले आहे तर काही ठिकाणी भातशेतीच कुजून गेले आहे. शेतीतून काहीच उत्पन्न आले नसल्याची स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. या परिस्थितीने येथील शेतकरी उदासिन झाला आहे.शेतकरी त्रस्त : विस्कळीत वातावरण, निसर्गचक्र बदलल्याचा फटकानिसर्गचक्र बदलल्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत असून, देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्याला मात्र नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार नेहमीच उदासिनता दाखवित आहे. त्यामुळे नुकसान किती झाले, हे सांगून उपयोग काय? नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे किती नुकसान झाले हे सांगण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. तर ते असलेली थोडीफार शेती वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. जूननंतर जुलै महिन्यात गायब झालेला पाऊस व त्यामुळे लांबणीवर पडलेली भातशेतीची लागवड व नंतर पावसाचे कमी झालेले प्रमाण यामुळे जिल्ह्यात यावर्षी भातशेतीची लागवडही काही प्रमाणात घटली. पण ज्यांनी ही लागवड केली त्यांना हंगामाच्या सरतेशेवटी आलेल्या पिकाची आशा लागून होती. भातकापणी झोडणीचा हंगामही जोमात सुरू झाला होता. दरम्यानच परतीच्या अवकाळी पावसाने भातशेतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी केल्यामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडून गेले. महागाईला तोंड देताना सामान्य लोक हैराण झाले असताना अशा काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची काय अवस्था होईल, याचा विचार करून येथील भातशेती करणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नोंदणी करणे सर्र्वाच्यादृष्टीने अत्यंत गरजेचे बनले आहे. शेतकरी अडकला समस्यांच्या गर्तेतचाऱ्यासाठी अखेरचा प्रयत्नअवकाळी पावसातून आपली भातशेती वाचावी, याकरिता भर पावसात भिजत काही शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, काही शेतकऱ्यांचे प्रयत्न अत्यल्प ठिकाणी यशस्वी झाले, तर बहुतांशी ठिकाणी अयशस्वी ठरल्याने शेतकरी भांबावलेल्या अवस्थेत आहे. आता शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे ती गुरांसाठीच्या चाऱ्याची सोय करण्यासाठी. किमान पिक राहूदे पण पिंजर (वाळलेला चारा) मिळूदे अशी म्हणण्याची वेळी शेतकऱ्यांवर आली आहे.मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरीयेथील शेतकऱ्यांची मुख्य शेती म्हणजे भातशेती. मात्र, तरीही कमी प्रमाणात या शेतीवर अवलंबून असणारी कुटुंबे मात्र अनेक, असे असताना याच शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष निधीची मदत जाहीर करावी. भातपिकापासून मिळणारे गवतही पावसाच्या पाण्यात कुजल्यामुळे खराब झाल्याने गुरांचा चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिकाने कोंब धरला ; पोटचा घास गेलामहागाईने होरपळून निघालेला शेतकरी यंदा भातशेती चांगली झाली असल्याने काही प्रमाणात का होईना, पण शेतकरी खुश होता. या भातशेतीचाच त्याच्या कुटंबाला आधार होता. मात्र, तोंडाशी आलेला हा भातशेतीचा घासही या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातून हिरावून घेतला. पावसामुळे भिजलेल्या पिकाला कोंब आले, तर काही ठिकाणी हे भात कुजून गेले आहे. त्यामुळे हे भातपीक वापरण्यास पूर्णपणे अयोग्य ठरले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याचे काम निसर्गाने केले आहे.
ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे ‘दिवाळे’
By admin | Updated: November 11, 2015 23:38 IST