मुंबई : दिव्यांग व्यक्तींसाठी कल्पक उपक्रम व नवे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करून नवे टप्पे निर्माण करावेत. दिव्यांग मुलांना शिकवण्यासाठी आणि त्यांना मुख्य सामाजिक प्रवाहामध्ये सहभागी करून घेण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने प्रशिक्षित करण्याची गरज आहे, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे समुपदेशन सत्रांमार्फत विशेष मुलांच्या गरजांविषयी सर्वसाधारण मुले व त्यांच्या पालकांना संवेदनशील करावे, असे मत व्यक्त केले. हशू अडवाणी कॉलेज आॅफ स्पेशल एज्युकेशनच्या बीएड (स्पेशल एज्युकेशन-लर्निंग डिसेबिलिटी) अभ्यासक्रमाचे उद्घाटन केले. विशेष बालकांना शिकवण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यातील तफावत कमी करण्यासाठी हा खास अभ्यासक्रम तयार केला, असे सीसीवायएमचे संचालक अमर असरानी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण गरजेचे - तावडे
By admin | Updated: July 31, 2016 04:51 IST