कुरकुंभ : दौंड तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांची परिस्थिती आहे तशीच असून दिवसेंदिवस दुष्काळाचे सावट पसरत चालले आहे. शासनाच्या माध्यमातून टँकरद्वारे पुरवठा करण्यात येणारे पाणी, तसेच सामाजिक संघटनांच्या माध्यमातूनदेखील करण्यात येणारी मदत कमी पडत असून ग्रामीण भागातील जनता दुष्काळाच्या भीषण परिस्थितीला सामोरी जात आहे.दौंड तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे, मात्र मिळणाऱ्या पाणीसाठ्यापेक्षा वापरात येणारे पाणी जास्त असल्यामुळे ग्रामीण भागातील जनता टँकर येण्याची वाट पाहत असतात. शासनामार्फत टँकर उपलब्ध केले जातात, मात्र मंजूर असलेल्या टँकरची संख्या पूर्ण होत नाही, त्यामुळे पाणी कमी प्रमाणात मिळते. सामाजिक संस्थेमार्फतदेखील या पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात तरी पाणी उपलब्ध होत आहे.
दौंड तालुक्यात पाण्याची विदारक परिस्थिती
By admin | Updated: May 19, 2016 01:55 IST