शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील जिल्हा रुग्णालयात आता मोफत केमोथेरपीची सुविधा, पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 14:37 IST

कर्करोगावरील उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या केमोथेरपीची मोफत सुविधा आता राज्यातील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुंबई - कर्करोगावरील उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या केमोथेरपीची मोफत सुविधा आता राज्यातील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत आहे. साधारणता जून महिन्यापासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. त्यात नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, जळगाव, नाशिक, वर्धा, सातारा, भंडारा आणि अकोला या 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील महिन्यापासून जिल्हा रुग्णालयातील फिजिशिअन आणि नर्स यांना मुंबईतील टाटा रुग्णालयात याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.कर्करोगाच्या उपचारात केमोथेरपी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी मुंबईतील टाटा रुग्णालयातर्फे आवश्यकतेनुसार सुमारे सहा आठवड्यांचा केमोथेरपी कोर्स रुग्णाला दिला जातो. यासाठी रुग्णाला दर आठवड्याला मुंबईत यावे लागते. त्यांना प्रवासाचा होणारा ताण, आर्थिक ताण ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आता मोफत किमोथेरपीची सुविधा जिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतला आहे. या सुविधेमुळे कर्करुग्णांना स्थानिकस्तरावरच उपचार घेता येणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार देशात वर्षभरात सुमारे 11 लाख कर्करुग्ण आढळून येतात. देशात जुने आणि नवे मिळून सुमारे 28 लाख कर्करुग्णांची संख्या आहे. त्यापैकी पाच लाख मृत्यू दरवर्षी कर्करोगाने होतात. महाराष्ट्रातील कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याबाबत राज्य शासनातर्फे उपाययोजना केल्या जातात. उपचारासोबतच प्रतिबंधात्मक आणि जाणीवजागृतीपर मोहीम हाती घेतली जाते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संपूर्ण महिनाभर मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. दिवसेंदिवस कर्करोगाचा वाढता प्रसार पाहता त्याच्या उपचारासाठी आरोग्य विभाग आणि टाटा रुग्णालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या सुविधेच्या पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. किमोथेरपी औषध देण्याचे प्रशिक्षण प्रत्येक जिल्हा रुग्णालयातील एक फिजिशिअन आणि स्टाफ नर्स यांना देण्यात येणार आहे. टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने मेडिकल ऑन्कोलॉजी विभागात तीन आठवड्यांचे हे प्रशिक्षण दिले जाणार असून, मे महिन्यापासून पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयांना फिजिशिअन आणि नर्स यांची नावे कळविण्यास सांगितली आहेत. जूनपासून हे केमोथेरपी युनिट जिल्हा रुग्णालयात सुरू होणार- आरोग्यमंत्रीकेमोथेरपीचा सहा आठवड्यांचा कोर्स टाटा रुग्णालयाकडून रुग्णांना दिला जातो. पहिल्या आठवड्याचा कोर्स हा टाटा रुग्णालयातच घेतला जातो. आता जिल्हा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून देणार असल्याने राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना त्यासाठी मुंबईत येण्याची गरज भासणार नाही. यामुळे त्यांचा निवासाचा आणि प्रवासाचा खर्च वाचणार असून रुग्णाला होणारी दगदग कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी युनिट सुरू करण्यासाठी लागणाऱ्या औषधांची यादी देखील टाटा रुग्णालयातून घेण्यात आली आहे. साधारणता जुनपासून हे युनिट जिल्हा रुग्णालयात सुरू होतील. उर्वरित जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या टप्प्यात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :cancerकर्करोग