शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाचे ‘फसवे’ नियोजन

By admin | Updated: September 26, 2015 02:53 IST

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रत्येक पर्वणीला कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून नियोजन करणाऱ्या पोलीस व जिल्हा प्रशासनाचे त्र्यंबकेश्वरच्या

नाशिक : तिसऱ्या व अंंतिम पर्वणीचे नियोजन पूर्णत: फसले. बारा तासाहून अधिक काळ भाविकांना गैरसोयीच्या गर्तेत अडकवून ठेवण्याबरोबरच आबालवृद्धांना उन्हातान्हात तब्बल २४ किलोमीटरहून अधिक पायपीट करण्यास भाग पाडणाऱ्या प्रशासनाने गेल्या दोन पर्वण्यांकडे पाठ फिरविणाऱ्या व शेवटच्या पर्वणीला गर्दी करणाऱ्या भाविकांवर एक प्रकारे सूडच उगविला. बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी व पाठोपाठ चौथा शनिवार, रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्यांमध्येच त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याची तिसरी व अंतिम पर्वणी असल्यामुळे भाविकांनी गुरुवारी सायंकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत कुशावर्तात स्नानासाठी भाविकांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न फोल ठरला, नाशिककडून त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत वाढ होत असल्याचे पाहून प्रशासनाने रात्री दोन वाजेनंतर नाशिक-त्र्यंबक मार्गावरील खंबाळे येथील बाह्य वाहनतळावरून एसटी बस सोडण्यावरही निर्बंध लादले. रात्री खंबाळे बाह्य वाहनतळ गाठलेल्या भाविकांना रात्रभर गैरसोयीचा सामना करत मुक्काम करावा लागला. सकाळ उजाडल्यावर एसटी बस कधी सुरू होतील याविषयी कोणतीही पूर्वसूचना एसटी वा जिल्हा प्रशासनाकडून दिली नसल्याने सकाळपासून भाविकांनी थेट रस्त्याचा ताबा घेत त्र्यंबकेश्वरकडे कूच केली. त्र्यंबकेश्वरमध्ये आखाड्यांचे शाहीस्नान सुरू असताना त्यात बाहेरगावाहून निघालेल्या भाविकांची भर पडल्याने पुरता गोंधळ उडाला. गल्लीबोळात बॅरिकेडिंग टाकून पोलिसांनी रस्त्यांची नाकाबंदी केली, त्यामुळे त्र्यंबकवासीयांनाही घराबाहेर पडणे मुश्कील झाले. खंबाळे वाहनतळापासून पायपीट करत लाखोंच्या संख्येने निघालेल्या भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. १२ किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी कोणतीही सुविधा करण्यात आलेली नव्हती. आबालवृद्ध, कडेवर तान्हुले घेऊन निघालेल्या भाविकांना पिण्याचे पाणीदेखील मिळाले नाही. (प्रतिनिधी)बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अखेरच्या पर्वणीत कुशावर्तात स्नान करून पुण्य पदरात पाडून घेण्याच्या विचारात असलेल्या भाविकांच्या पदरी मात्र हालअपेष्टाच पडल्या. नाशिककडून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांना पायपीट करावी लागली. तोच अनुभव पर्वणीच्या आदल्या दिवसापासून त्र्यंबकेश्वरी स्नानासाठी मुक्कामी राहिलेल्या भाविकांनाही प्रशासनाने दिला.ज्या भाविकांनी रात्रीच स्नान आटोपून घेतले व ज्यांनी सकाळी आखाड्यांसोबत स्नान केले अशा भाविकांच्या परतीसाठी एसटी बसची सोय न करता त्यांनाही खंबाळे बाह्य वाहनतळापर्यंत पायपीट करण्यास भाग पाडले. रात्रभर जागरण केलेल्या भाविकांच्या शिव्याशापाचे धनी प्रशासनाला व्हावे लागले.