शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

तंटामुक्त गावांचे जिल्हाबाह्य मुल्यमापन प्रलंबित !

By admin | Updated: July 20, 2014 22:49 IST

राज्यभरातील हजारो गावांना शासन निर्णय व जिल्हाबाह्य मुल्यमापणाची प्रतीक्षा आहे.

वाशिम: आचारसंहितेच्या बडग्यामुळे आधीच अंमलबजावणीला ग्रहण लागलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २0१२-१३ तंटामुक्त ग्राम होण्याच्या दिशेने पाउल उचलणार्‍या तसेच २0१३-१४ मध्ये स्वयंमुल्यमापनानंतर जिल्हांतर्गत मुल्यमापणाची प्रक्रीया पार पाडणार्‍या राज्यभरातील हजारो गावांना शासन निर्णय व जिल्हाबाह्य मुल्यमापणाची प्रतीक्षा आहे.गावातील तंटे गावातच मिटविण्याचा महत्वाकांक्षी दृष्ट्रीकोन ठेवून राज्य शासनाने सन २00७ पासून राज्यभरात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरु केली.या मोहीमेत ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या गावांना लोकसंख्येच्या प्रमाणावर आधारीत लाखोचे पुरस्कार देण्याचे धोरण अंगीकारले. सोबतच या मोहिमेचा प्रचार व प्रसार व्यापक प्रमाणात होण्यासाठी राज्यभरातील पत्रकांरासाठी पूरस्कार योजनाही राबविली गेली. एकट्या वाशीम जिल्ह्यात या सर्व शासकीय उपकक्रमाचा परिपाक म्हणून आजतागायत ४९३ ग्रामपंचायतीपैकी २७२ गावांनी तंटामुक्त ग्राम म्हणून घोषित होण्यासह जवळपास सहा कोटी रुपये जिल्ह्याला पूरस्काररुपात मिळवून दिले आहेत. २0१३-१४ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या गतीला पार पडलेल्या सोळाव्या लोकसभेच्या निवडणूकिसह काही ठिकाणच्या विधानसभेच्या पोटनिवडूकिसाठीच्या आचारसंहितेमुळे गतिरोध लागला होता. दरवर्षीच्या नियोजनानुसार तंटामु.क्तीच्या कार्याचे मुल्यमापन करणार्‍या १५ एप्रिलपूर्वी गठीत होणे आवश्यक असतांना त्या ५ मे पूर्वी गठीत कराव्या लागल्या. ३0 एप्रीलपूर्वी प्रशिक्षण व मुल्यमापणाची करावी लागणारी कारवाई २२ मे पूर्वी करावी लागली. सहाजीकच मुल्यमापनाच्या कामासाठी ५ जून ते ५ जूलै पर्यंतचा कालावधी शासनाला निश्‍चीत करावा लागला. अर्थात शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीत समित्यांचे गठण व स्वयंमुल्यमापणानंतरची जिल्हांतर्गत मुल्यमापणाची प्रक्रीया राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्याने पार पाडली. परंतू शासनाने राज्यभरातील कोणत्या जिल्ह्याची समिती कोणत्या जिल्ह्याचे जिल्हाबाह्य मुल्यमापन करेल याचा निर्णयच आजतागायत न घेतल्याने आधी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या २0१३-१४ मध्ये तंटांमुक्त गाव मोहिमेत सहभागी गावांना यासंबंधी शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे. अर्थात २0११-१२ प्रमाणे तंटामुक्त गाव मोहिमेच्या निर्णयासंबंधी निर्णय घेण्यास शासनाने विलंब लावला व होउ घातलेल्या विधानसभा निवडणूकिची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यासंबंधी निर्णय न लागल्यास राज्यभरातील हजारो गावांच्या हिताच्या या मोहिमेला मोठे ग्रहण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ** महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २0१३-१४ मध्ये वाशीम जिल्ह्यातील ९६ गावांनी स्वयंमुल्यमापणाचे अहवाल सादर केल्याने त्या गावांचे जिल्हांतर्गत मुल्यमापणाचे काम जिल्ह्यातील सहाही तालुकास्तरीय समित्यांनी ५ जूलै पूर्वी केले. यामध्ये वाशिम तालूक्यातील १३, कारंजा तालूक्यातील २३, मानोरा तालूक्यातील १९, मंगरुळपीर तालूक्यातील १७, रिसोड तालूक्यातील २0 व मालेगाव तालूक्यातील ४ गावांचा समावेश होता. जिल्हाभरातील २७२ गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित झाली असली तरी आजही २२१ गावांना तंटामुक्त गावं मोहीमेत सहभागी होण्याची व पूरस्कारासाठी पात्र ठरण्याची प्रतीक्षा आहे. जिल्हांतर्गत मूल्यमापणाची प्रक्रीया पार पाडणार्‍या या गावांना आता जिल्हाबाह्य मुल्यमापणाची प्रतीक्षा आहे. अर्थात २0१३-१४ ची ही सर्व प्रक्रिया १५ ऑगस्ट २0१४ पूर्वी पूर्ण करुन प्रत्येक जिल्ह्याला २0१४-१५ साठी मोहिमेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कामाला लागता येणे सोईचे होणार आहे. २0१२-१३ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गावं मोहिमेंतर्गत वाशीम जिल्ह्यातील ३६ गावांचा जिल्हाबाह्य मुल्यमापणाचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यापैकी कोणत्या गावांची तंटामुक्त गाव म्हणून निवड केली गेली हे राज्य शासनाने आजतागायत जाहीर केले नाही. त्यामुळे २0१२-१३ मधील अहवाल पाठविणारी राज्यभरातील गावे एकीकडे आपण पूरस्कारासाठी पात्र ठरलो किंवा नाही याची प्रतीक्षा करीत असतांनाच राज्य शासनाला २0१३-१४ मध्ये मोहिमेत सहभागी गावांच्या जिल्हाबाह्य मुल्यमापणासंबंधीही निर्णय जाहीर करावा लागणार आहे.