शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

राज्यातील ७३ हजार विद्यार्थ्यांना ७० कोटींची शिष्यवृत्ती, सारथी शिष्यवृत्तीचे वितरण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:58 IST

कोल्हापूर : राज्यातील मराठा , कुणबी, कुणबी मराठा , मराठा कुणबी ७३ हजार विद्यार्थ्यांना तब्बल ७० कोटी ८ लाख ...

कोल्हापूर : राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी ७३ हजार विद्यार्थ्यांना तब्बल ७० कोटी ८ लाख रुपयांच्या छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. योजना सुरू झाल्यापासूनची शिष्यवृत्तीची आणि लाभार्थ्यांचीही सर्वाधिक रक्कम व संख्या आहे.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी एन.एम.एम.एस. म्हणजेच शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेण्यात येते. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या ‘सारथी’कडून ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. एन.एम.एम.एस.ची शिष्यवृत्ती निवडक गुणवंतांनाच मिळते. परंतु, ही परीक्षा उत्तीर्ण होणारे गुणवत्तापूर्णच असतात. त्यांना पाठबळ देण्यासाठी ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे.यामध्ये ९वी ते १२वीपर्यंत नियमित शिक्षण घेणाऱ्या अनुदानित विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेल्या तसेच केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ९ हजार ६०० रुपये असे चार वर्षांत एकूण ३८ हजार रुपये देण्यात येतात.

सन २०२४/२५ या वर्षामध्ये आतापर्यंत या शिष्यवृत्तीसाठी राज्यातून ९वी ते १२वीच्या ७३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यातील अर्ज मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या सर्वांना ७० कोटी ८ लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत. त्यातील ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, अमरावती, वर्धा, नाशिक, चंद्रपूर व नांदेड या दहा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना आतापर्यंत २ कोटी ६४ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरणही करण्यात आले आहे. उर्वरित जिल्ह्यातील वितरण लवकरच करण्यात येणार आहे.सन - विद्यार्थी संख्या - वितरित शिष्यवृत्तीसन २०२१/२२ - १०,४१४ - ९ कोटी ९९ लाख ७४ हजार रुपयेसन २०२२/२३ - २२.३०० - २१ कोटी ४० लाख ८० हजार रूपयेसन २०२३/२४ - ४४.१०५ - ४२ कोटी ३४ लाख ८ हजार रूपयेसन २०२४/२५ - ७३,००० - ७० कोटी ८ लाख रूपये

या शिष्यवृत्तीमुळे या गटातील विद्यार्थ्यांचा एनएमएमएस परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षण कार्यालयातील अधिकाऱ्यांचे सुयोग्य प्रयत्न, प्रोत्साहन यामुळे परीक्षेतील यशाचा टक्का वाढत आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. - किरण कुलकर्णी सहव्यवस्थापकीय संचालक सारथी, उपकेंद्र कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्तीmarathaमराठा