शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलांना बेकायदा प्रमाणपत्रांचे वाटप, राज्य सरकारनेच दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 13:48 IST

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनाथांना राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये समांतर आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला होता. तेव्हापासून अनाथ असल्याची  प्रमाणपत्रे मिळविण्याचे  प्रमाण वाढले आहे.

मुंबई : राज्यात अनाथ मुलामुलींना सरकारी नोकऱ्यांमध्ये एक टक्का समांतर आरक्षण लागू झाल्यानंतर विविध विभागाचे अधिकारी त्यांना अधिकारच नसताना अनाथ असल्याची  प्रमाणपत्रे वाटत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर आता हे अधिकार कोणाला आहेत, याबाबतचे परिपत्रक महिला व बाल विकास विभागाने मंगळवारी काढले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनाथांना राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये समांतर आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला होता. तेव्हापासून अनाथ असल्याची  प्रमाणपत्रे मिळविण्याचे  प्रमाण वाढले आहे.  प्रत्यक्षात हे  प्रमाणपत्र देण्याचे अधिकार फक्त महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उपायुक्तांनाच आहेत. त्यावर अपील हे महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्तांकडे करता येते. असे असताना महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांकडूनदेखील अनाथ  प्रमाणपत्रे वितरित करण्यात येत असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आली. 

यापुढे अधिकार नसताना अवैधरीत्या कोणी अधिकारी ही  प्रमाणपत्रे देत असल्याचे आढळले तर तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही महिला व बाल विकास विभागाने दिले आहेत. अन्य विभागांतील अधिकाऱ्यांनी वितरित केलेली अनाथ  प्रमाणपत्रे ही अवैध असल्याचे सर्व  प्रशासकीय विभाग, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील भरती  प्राधिकरणे/ निवड मंडळे यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

- महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उपायुक्तांव्यतिरिक्त अन्य विभागातील अधिकाऱ्यांनी वितरित केलेली  प्रमाणपत्रे ही भरती  प्रक्रियेमध्ये स्वीकारू नयेत वा मान्य करू नयेत, असे बजावण्यात आले आहे.- अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन माध्यमिक, उच्च माध्यमिक व उच्च शिक्षण संस्थांमध्ये  प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात येणारी अनाथ  प्रमाणपत्रे ही विभागीय उपायुक्तांकडूनच वितरित झाल्याची खात्री शिक्षण विभागाने करावी, असेही बजावण्यात आले आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस