शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

औषधांपासून मनोरुग्ण वंचित

By admin | Updated: February 7, 2017 05:00 IST

दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. वेळेत औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. मात्र, सरकारी अनास्थेमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे

सुमेध वाघमारे, नागपूरदररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. वेळेत औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. मात्र, सरकारी अनास्थेमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. बाह्यरुग्ण विभागात ५० टक्के औषधांचा तुटवडा आहे. यातच रुग्णालयात नसलेली औषधे लिहून देणे हे नियमबाह्य ठरत असल्याने रुग्ण औषधांपासून वंचित राहत आहे. परिणामी, आजार बळावत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

प्रादेशिक रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज २५० वर रुग्ण येतात. यातील बहुसंख्य रुग्णांवर महिनोंमहिने उपचार करावे लागतात. गरीब मनोरुग्णांसाठी हे रुग्णालय आशेचा किरण आहे. परंतु लालफितीचा मनमानी कारभार, अपुरा निधी, डॉक्टरांची कमतरता, पर्यायी उपचारांची वानवा अशा त्रुटींमुळे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. यातच गेल्या महिन्यांपासून आवश्यक व तातडीने लागणारी औषधेही नसल्याने मनोरुग्णांचे हाल होत आहेत. सूत्रानुसार, ‘अ‍ॅण्टी सायोकोटीक’ सारखेच मिरगीवरील ‘अ‍ॅण्टी इपिलेप्टिक’ औषधांचे सात ते आठ प्रकार आहेत. परंतु यातील केवळ दोनच प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. तणावावर उपयुक्त असलेले ‘एन्टी डिप्रेशन’ औषधेही पुरेशी नाहीत. मिरगीच्याऔषधांचाही अभावमिरगीच्या रुग्णांना दिले जाणारे ‘इपिटॉइन’ औषधांचाही तुटवडा आहे. ‘पॅसीटेन’, ‘लोराझीपॉम’ आदी महत्त्वाचे औषध नाहीत. येथील डॉक्टरांना रुग्णालयात नसलेली औषधे बाहेरून विकत घेण्यासाठी लिहूनही देता येत नाहीत. असे केल्यास रुग्ण ‘१०४’ क्रमांकावर तक्रारी करू शकतात. यामुळे डॉक्टर आवश्यक औषधे लिहून न देता पर्यायी औषधे देऊन वेळ भागवून नेत असल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर औषधांची खरेदी रुग्णालयात औषधेच नाहीत, असे नाही. जी औषधे नाहीत त्याच्या पर्यायी औषधे दिली जात आहेत. रुग्णालयात जी औषधे नाहीत त्याची माहिती मिळताच सोमवारी पाच हजार रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली आहेत. या शिवाय औषधांसाठी मोठा निधी लवकरच रुग्णालयाला उपलब्ध होणार आहे. -डॉ. आर.एस. फारुखी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय