- ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड, दि. 27 - येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानमधील विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले असून यासंदर्भात न्यायालयाने २६ ऑगस्ट रोजी सहायक धर्मदाय आयुक्तांना आदेश दिले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे, की कारंजा येथील शेखर पुरूषोत्तम काण्णव, प्रमोद दहिहांडेकर, गजानन जोशी यांनी धर्मदाय आयुक्त, अमरावती यांचे न्यायालयात १३ ऑगस्ट २०१२ रोजी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ डी अंतर्गत श्री गुरूमंदिर संस्थान विश्वस्तांच्या विरोधात तक्रार करून विश्वस्त मंडळ निष्कासित करण्याची याचिका दाखल केली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयाया नागपूर खंडपिठास ८ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या निर्णयाप्रमाणे निष्कासित करण्याचे प्रकरण सहा महिन्यात निकाली काढायचे होते. परंतू सहा महिन्याच्या आत सदर प्रकरण काही कारणास्तव निकाली निघाले नाही. याबाबतची वस्तूस्थिती तक्रारकर्त्यांच्या वकीलांनी २७ जुलै २०१६ रोजी न्यायालयासमोर मांडली असता, उच्च न्यायालयाने २६ ऑगस्ट २०१६ पर्यंत प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, उच्च न्यायालय, सहधर्मदाय आयुक्त, अमरावती यांनी २६ ऑगस्ट रोजीच्या निकालात विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे धार्मिक क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.