शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

मोदी सरकारपाठोपाठ ठाकरे सरकारचाही राणेंना धक्का? 'त्या' विधानामुळे अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 19:17 IST

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणी वाढल्या; महिला आयोगाकडून 'त्या' विधानाची दखल

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूवर संशय उपस्थित करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे. राणेंनी केलेल्या आरोपांची तक्रार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे केली. त्याची दखल घेत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. याबद्दलचा अहवाल ४८ तासांत सादर करण्याचे आदेश चाकणकर यांनी दिला आहे. दिशा सालियनच्या बदनामी प्रकरणी राणेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. श्रीमती दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नसून त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे, अशी माहिती चाकणकरांनी ट्विट करून दिली आहे. 

महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणेंच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. दिशाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन आला असताना, त्यात बलात्काराचा उल्लेखही नसताना राणे यांच्याकडून करण्यात आलेली विधानं दुर्दैवी असल्याचं पेडणेकर म्हणाल्या. एखाद्या महिलेच्या निधनानंतर तिच्या चारित्र्याबद्दल अशी विधानं करणं धक्कादायक असल्याचंही त्या म्हणाल्या. आपण सालियन कुटुंबाची लवकरच भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

नीलरत्न बंगल्यावर हातोडा?राणे कुटुंबीयांचा मालवण जिल्ह्यातील नीलरत्न बंगल्यावर हातोडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रातील मोदी सरकारने यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर राणे कुटुंबीयांचा नीलरत्न हा बंगला आहे. हा बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Rupali Chakankarरुपाली चाकणकरKishori Pednekarकिशोरी पेडणेकर