ऑनलाइन लोकमत/उमेश जाधव टिटवाळा, दि. 13 - कल्याण तालुकाच्या ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या असल्याचे चित्र सर्वत्र पाहवयास मिळते. यावेळी सहाजिकच ते लावणी रूपी गीताची ओळी ओठावर येतात. आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा मला लागलाय खोखला मधाच बोट कुणी चोखवा...गुलाबी थंडीला सध्या जोरदार सुरुवात झाली आहे. यामुळे शेकोट्यांनी देखील पेट घ्यायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटत आहेत व तिच्या भोवती शरीराला ऊब मिळावी म्हणून शेकण्यासाठी सात लोक बसलेली दिसून येतात. नुकताच केंद्र सरकारने घेतलेल्या पाचशे-हजारच्या नोटा चलनातून काढण्याच्या क्रांतिकारी निर्णयामुळे लोकांची झोप उडाली आहे. आपल्याजवळ असणाऱ्या पाचशे-हजारच्या नोटा कशा खपवायच्या, सुट्टे पैसे मिळविण्यासाठी काय करायचे, काळा पैसा कसा बाहेर पडले या सारख्या अनेक गोष्टीच्या चर्चा या शेकोट्या वर शकणार्या लोकांत सध्या रंगात असल्याचे चित्र दिसत आहे. थंडीचे प्रमाण सध्या दिवसेंदिवस सतत वाढतआहे. यंदा थंडीचे प्रमाण जास्त असणार असल्याचे मत काही जुने वयोवृद्ध जाणकार नागरिक मांडत आहेत.
शेकोट्यांवर रंगतेय नोटबंदीची चर्चा
By admin | Updated: November 13, 2016 18:18 IST