शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साखरेवर उपकर लावण्याबाबत विचारविनिमय - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:25 IST

देशभरात अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी साखरेवर उपकर लावण्यासह इतर पर्यायांवर रविवारी संबंधित मंत्रीगटात चर्चा झाली.

मुंबई : देशभरात अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी साखरेवर उपकर लावण्यासह इतर पर्यायांवर रविवारी संबंधित मंत्रीगटात चर्चा झाली. या वेळी राज्यातील ऊस उत्पादक शेतकºयांच्या हिताची बाजू आपण बैठकीत मांडल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.वस्तू व सेवा करांतर्गत (जीएसटी) साखरेवरील उपकर आकारणी या विषयावरील मंत्रीगटाची आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. आसामचे वित्तमंत्री हेमंथा बिस्व सर्मा यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीस मुनगंटीवार यांच्यासह उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू आदी राज्यांचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत जीएसटी अंतर्गत साखरेवर उपकर लावता येईल का, यासह अन्य पर्यायांवर चर्चा झाली. इथेनॉलचा कर दर १८ वरून ५ टक्के, साखरेवरील कर दर ५ वरून १२ टक्के, साखर निर्यात अनुदानात दुप्पट वाढ, ऊस उत्पादक शेतकºयांप्रमाणे इतर कृषी उत्पादक शेतकºयांना मदत करण्यासाठी कृषी उत्पादनांवर उपकर, शुगर केन फॉमर्स वेल्फेअर फंड आदी पर्यायांची चाचपणी करण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.जीएसटी कायदा करताना १७ कर आणि २३ उपकर यात विलीन झाल्याने ऊस उत्पादक शेतकºयांना मदत करण्यासाठी लागणारा निधीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांना अधिकाधिक मदत करता यावी यादृष्टीने अभ्यासपूर्ण पर्याय देण्यासाठी जीएसटी परिषदेने ही समिती स्थापन केली आहे. ऊस उत्पादक शेतकºयांना मदत करण्यासाठी सेस लावता येईल का, याबाबत कायद्यात काय तरतूद आहे हे समजून घेण्यासाठी महालेखापालांकडून अहवाल मागवला असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेतून ऊस उत्पादक शेतकºयांना मदत करण्यासाठी एक भक्कम व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार