शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

बेशिस्त चालकांना शिस्तीचा ब्रेक

By admin | Updated: October 20, 2016 01:41 IST

पाच तासांच्या धिंगाण्यांनतर वल्लभनगर आगारात येणाऱ्या सर्व एसटीचालकांची मद्यपान तपासणी चाचणी करण्यास सुरुवात झाली

पिंपरी : मद्यपान करून स्वारगेट आगारातून भुम-बोरिवली एसटी गुरुवारी (१३) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास वल्लभनगरच्या बसस्थानकात पोहचविणाऱ्या लिंबराज साहेबराव चव्हाण या चालकाच्या पाच तासांच्या धिंगाण्यांनतर वल्लभनगर आगारात येणाऱ्या सर्व एसटीचालकांची मद्यपान तपासणी चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे़ गुरुवारी चव्हाण या एसटीचालकाने ३८ प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेदरकारपणे एसटी चालवत वल्लभनगर आगारात एसटी पोहचविली होती़ त्या पार्श्वभूमीवर आगारात विविध ठिकाणांहून येणाऱ्या चालकांची मद्यपान तपासणी यत्रंणा सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे आता व्यसन करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी चालविणाऱ्या चालकांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे़ वल्लभनगर आगारात दररोज महाराष्ट्रभरातील विविध आगारांतून एसटी दाखल होत असतात़ राज्यातील सर्वांत मोठी उद्योगनगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणांहून नागरिक येथे वास्तव्यास आहेत़ अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने शहरातील अनेक नागरिक आपल्या गावी जाण्यासाठी एसटीचा पर्याय निवडतात़ मात्र, गेल्या काही महिन्यांत एसटीच्या बाबतीत चाकाचे नट बोल्ट निसटणे, मद्यपान करून एसटी चालविणे अशा घटना घडल्यामुळे राज्यातील प्रत्येक आगार व्यवस्थापकांनी प्रवाशांची काळजी घेण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्या, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे़ एसटी महामंडळाच्या विशेष पथकाकडून मद्यपान तपासणी यंत्रणा कारवाई करीत असते़ त्यामुळे नव्याने वल्लभनगरच्या आगारात मद्यपी चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे़ परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी चालकांच्या कार्यशाळेत एसटीच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळे चालकांवर ताण वाढत आहे, असे खडे बोल सुनावले होते़ (प्रतिनिधी)>एसटी महामंडळाच्या वतीने प्रत्येक आगारामार्फ त विशेष पथकाकडून नियमितपणे मद्यपान केलेल्या चालकांवर कारवाई केली जाते़ वल्लभनगरच्या आगारात येणाऱ्या एसटीचालकाची मद्यपान तपासणी करण्यात येणार आहे़ तपासणीत कोणी दोषी आढळल्यास कडक कारवाई करणार आहे़ - अनिल भिसे, वल्लभनगर आगार व्यवस्थापक