कामशेत : नाणे मावळात जाण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर नऊ-दहा वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुलाची उभारणी करण्यात आली आहे. जुन्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात तो पाण्याखाली जात असल्याने नवीन पुलाची उंची वाढविण्यात आली. पण रस्त्याची उंची पुलापेक्षा कमी असल्याने, तसेच येथील रस्त्यावरील मोरींची दुरवस्था झाल्याने पाऊस व नदीचे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक बंद होत असते. त्यामुळे पुलाएवढी रस्त्याची उंची करावी, अशी मागणी होत आहे.कामशेतमधून नाणे मावळात जाण्यासाठी इंद्रायणी नदी ओलांडावी लागते.नदीवर तीन पूल असून, एक सर्वात जुना व पडीक अवस्थेत आहे. त्याच्या बाजूला दुसरा पूल आहे. या पुलावरूनही पाणी जात असल्याने दहा वर्षांपूर्वी या दोन पुलांच्या मध्ये तिसऱ्या पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाची उंची जास्त ठेवण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पुलाच्याउंचीला प्राधान्य देऊन तशी उपाययोजना केली. पण, पुलाच्या पुढील रस्त्यावर पावसाळ्यात गेली अनेक वर्षे नदीच्या पुराचे पाणी येत असते. यामुळे नाणे मावळातील सर्व गावांचा संपर्क तुटतो. हे शासकीय अभियंत्यांच्या लक्षात का येत नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत. पुलाची उंची व रस्त्याची उंची यात मोठी तफावत असल्याने पुराच्या पाण्यात पूल शाबूत राहतो; पण, रस्ता मात्र तीन ते चार फूट पाण्याखाली जातो. थोड्या पावसातही एक किलोमीटरच्या या रस्त्यावर पाणी येऊन कामशेत व नाणे मावळाचे दळणवळण ठप्प होत आहे. अनेक वर्षांच्या या समस्येने नागरिक त्रस्त असून दुग्ध व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदारवर्ग व इतर व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. नाणे मावळात साधारण ३० ते ३५ गावे व वाड्या-वस्त्या आहेत. नाणेगाव, नवीन उकसान, नाणोली, साई, वाउंड, कचरेवाडी, घोणशेत, देशमुखवाडी, खरमारेवाडी, लंकेवाडी, कांब्रे, कोंडिवडे, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, ब्राह्मणवाडी, पालेनामा, गोवित्री, उकसान, वडवली, वळवंती, कोळवाडी, उंबरवाडी, खांडशी, सांगिसे, भाजगाव, सोमवडी, शिरदे, थोरण, जांभवली आदी गावांतून व दुर्गम भागामधून लोक खरेदी, व्यवसाय, शिक्षणासाठी व इतर कामांसाठी येत असतात. पावसाळ्यात हा रस्ता पाण्याखाली गेल्यास व्यावसायिकांचे मोठे नुकसान होते. विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजल्नदी पलीकडील रस्त्यावर दर वर्षी पाणी येत असून, तीन-चार फूट पाणी रस्त्यावरुन वाहत असते. वाहने व माणसे वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहे. पलीकडे असलेला अनाथाश्रम व मंदिर पूर्ण पाण्याखाली जाते. जुना पूल पाण्याखाली जातो म्हणून जास्त उंचीचा नवीन पूल करोडो रुपये खर्च करुन बांधला. पण, रस्त्याच्या उंचीकडे लक्ष दिले नाही. रस्ता पाण्याखाली जाऊन सर्वच गावांचा संपर्क तुडत असल्याने पुलासाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे, असे नागरिक सांगतात. याशिवाय या रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोऱ्यांची दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांनी भराव केल्याने मोरींचे अस्तित्वच नाहीसे झाले आहे. पाणी वाहून जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे नदीचे पाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन साचते. नाणे मावळात पावसाळ्याच्या दिवसांत अनेक पर्यटक वर्षाविहारासाठी येत असतात. येथे प्राचीन कोंडेश्वर मंदिर, ढाकभैरी, धरणे, तसेच अनेक गावात प्राचीन मंदिरे आहेत. येथील डोंगररांगांमधून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी, भिजण्यासाठी पर्यटक येतात. पावसाचा जोर वाढला, की रस्त्यावर पाणी येते. रस्ता बंद झाल्याने अनेक पर्यटक पलीकडे अडकून पडतात. शासनाने लवकरात लवकर या रस्त्याची उंची वाढवावी, पाण्याचा निचरा होण्यासाठी मोरी व चर काढावे, रस्त्याची कमी झालेली रुंदी रस्त्याची हद्द कायम करून त्यावरील शेतांची अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी होत आहे. जाता येत नाही.नोकरदारांचे कामाचे खाडे होतात. कधी कधी तर चार ते पाच दिवस या रस्त्याचे पाणी ओसरत नाही. अशा वेळी अनेक लोक कामशेतमध्ये अडकून पडतात. या वेळी त्यांना पाहुण्या-रावळ्यांकडे राहावे लागते. वर्षाविहारासाठी येणारे पर्यटकही पलीकडे अडकून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. नाणे मावळातील नागरिकांचे अतोनात हाल होतात. रग्णांना दवाखान्यात आणणेअवघड होऊन जाते. (वार्ताहर)
नवीन पूल उभारूनही गैरसोय
By admin | Updated: June 28, 2016 01:54 IST