शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कचराकुंडीतून थेट चित्रात... रस्त्यावरील कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तींना चक्क भिंतीवरील चित्रांमध्ये स्थान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 17:43 IST

प्रत्येक शहरात नगरपालिकेच्या वतीने रस्त्यावरील केरकचरा गोळा करण्यासाठी माणसे नेमलेली असतात. सदरची माणसे हि ठेकेदाराकडे काम करत असतात.

अजय बुवा / फोंडाप्रत्येक शहरात नगरपालिकेच्या वतीने रस्त्यावरील केरकचरा गोळा करण्यासाठी माणसे नेमलेली असतात. सदरची माणसे हि ठेकेदाराकडे काम करत असतात. अत्यल्प अशी मजुरी त्याना मिळत असते.  शिक्षित व समाजसुधारक लोकांनी निर्माण केलेला कचरा गोळा करून शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ह्या लोकांवर असते. प्रचंड दर्प व घाण असलेला कचरा हाताने गोळा करणे. पोत्यातून व्यवस्थित भरून कचरा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोहोचवण्याचे काम ही माणसे करत असतात. लोक त्यांना पाहून लांब राहतात कारण त्यांच्या अंगाला सुद्धा त्या कचऱ्यांचा दर्प येत असतो. अशा ह्या व्यक्तींचा योग्य तो सन्मान फोंडा नगरपालिकेने केला आहे. त्यांनी केलेल्या कष्टाचा एक प्रकारे यथोचित गौरव केलेला आहे.नवीन तीन मजली मार्केट संकुल मध्ये सुंदरता आणण्यासाठी  डाव्या बाजूची  संपूर्ण मोठी भिंत ही चित्रमय करण्यात आले आहे .या भिंतीवर हवे तर महापुरुषांचे किंवा अन्य काही मोहक चित्रे काढता आली असती परंतु नगरपालिका व्यवस्थापनाने चक्क रस्त्यावरील कचरा गोळा करणाऱ्या लोकांची पोट्रेट्स इथे रंगवली आहेत. गुलाब मांजी ,दीपिका शिंदे व जारमन ऋषी या तीन कचरा गोळा करणाऱ्या लोकांची हुबेहुब चित्रे तिथे रेखाटली गेली आहेत.  शहरात किमान 50 जण कचरा गोळा करत असतील. त्यातली सर्वात ज्येष्ठ  अशा या तीन व्यक्ती. नगरपालिकेच्या ह्या कृतीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कालानुरूप कचरा गोळा करणारी ही माणसे आपल्या गावी परत जातील. किंवा एक दिवस या जगाचा  निरोप सुध्दा घेतील. परंतु भिंतीवरील त्या चित्रामुळे मात्र ती कायम फोंडावासियांच्या स्मरणात राहतील. प्रत्येक नगरपालिकेने  लहानसहान कृती मधून आपली कृतज्ञता अशा माणसाबाबत व्यक्त केल्यास तो त्यांचा खरेच सन्मान होईल.आज ज्या ज्या वेळी ह्या तीन व्यक्ती आपल्या चित्रांकडे पाहत असतील त्यावेळी त्यांना खरेच धन्य झाल्यासारखे वाटत असेल. कचराकुंडीतून थेट चित्रात असा स्वप्नवत प्रवास त्यांचा झालेला आहे. फोंड्यातील नागरिक सुध्दा त्या चित्रमय भिंतीकडे कौतुकास्पद नजरेतून पाहत आहेत.