मुंबई : दिंडोशीच्या खोत डोंगरी परिसरात एका वादात मध्यस्थी करण्यास गेलेल्या शिवसेना गटप्रमुखाची मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास हत्या करण्यात आली. रमेश जाधव(२७) असे गटप्रमुखाचे नाव असून, रात्री उशिरापर्यंत दिंडोशी पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ रमेश जाधव खोत डोंगरी येथील बबन चाळीत वास्तव्यास होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास सोहेल अन्सारी चहाटपरी चालकाला मारहाण करत होता. जाधव यांनी मध्यस्थी केली़ तेव्हा सोहेल आणि त्याच्या कुटुंबियांनी जाधव यांची चॉपर व तलवारीने हल्ला केला. यामध्ये जाधव गंभीर जखमी झाले. रूग्णालयात नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला़ जाधव यांच्या हत्येनंतर सोहेल व त्याचे कुटुंब फरार झाले. या कुटुंबाला गुन्हेगारी पार्श्वभुमी असून परिसरात दहशत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली़ दरम्यान, रात्री उशिरा शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, माजी आमदार विनोद घोसाळकर, विभागप्रमुखांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या दिला़ दिंडोशी पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला़ (प्रतिनिधी)
दिंडोशीत शिवसेना गटप्रमुखाची हत्या
By admin | Updated: October 22, 2014 06:12 IST