शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

दिघी बंदराचा अपुरा वापर, सामंजस्य करारामुळे आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 05:50 IST

देशाच्या पश्चिम किना-यावर आणि मुंबई या आर्थिक राजधानीच्या जवळ महत्त्वाचे बंदर म्हणून विकसित करण्यात आलेल्या दिघी बंदराची १८ लाख टन क्षमता वापराविना पडून आहे.

चिन्मय काळे मुंबई : देशाच्या पश्चिम किना-यावर आणि मुंबई या आर्थिक राजधानीच्या जवळ महत्त्वाचे बंदर म्हणून विकसित करण्यात आलेल्या दिघी बंदराची १८ लाख टन क्षमता वापराविना पडून आहे. हे बंदर आता केंद्राकडून संजीवनी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेशी झालेला सामंजस्य करार तंतोतंत पाळला गेल्यास, हे बंदर भविष्यात जेएनपीटीलादेखील मागे टाकेल, असा विश्वास दिघी पोर्टचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय कलंत्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.राज्याच्या मेरिटाइम बोर्डाकडून २०५२ पर्यंत लीझवर असलेल्या दिघी बंदरात आयात-निर्यातीचा चेहरा बदलण्याची क्षमता आहे. लीझ करार होऊन आता १५ वर्षे लोटली, तरी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे हे बंदर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले नाही. १६०० एकरावरील या बंदरात वर्षाला २० लाख टन मालाची चढ-उतार क्षमता आहे. प्रत्यक्षात केवळ दीड ते दोन लाख टन एवढीच उलाढाल येथून सुरू आहे.‘दिघी हे गुजरात ते दक्षिण भारतापर्यंत पश्चिम किनाºयावरीले महत्त्वाचे बंदर ठरू शकते, पण बंदरापर्यंत येण्यासाठी आतापर्यंत हवा तसा महामार्गच येथे तयार होऊ शकलेला नाही. रेल्वेची कनेक्टिव्हिटीदेखील अद्याप नाही. त्यामुळे या बंदरावरून सामानाची ये-जा करण्यात अडचणी आहेत. सुदैवाने पायाभूत सुविधांची कामे आता सुरू झाली आहेत. ही कामे वेळेत पूर्ण झाल्यास, येत्या तीन वर्षांत दिघी पोर्ट पश्चिम भारतातील अति महत्त्वाचे बंदर ठरेल,’ असे मत कलंत्री यांनी व्यक्त केले.दिघी पोर्ट हे देशाच्या आर्थिक राजधानीपासून जेमतेम ८० किमीवर आहे. अलीकडेच केंद्र सरकारने दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये (डीएमआयसी) या बंदराचा समावेश केला. त्यामुळे आगरदांंडा ते माणगाव मार्गे दिघी, तसेच दिघी ते माणगाव हा मार्ग राष्टÑीय महामार्गाशी जोडला जाणार आहे. माणगावहून हाच रस्ता पुढे पुण्यापर्यंत जाणार आहे. ७५० कोटी रुपयांची ही योजना १४ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासोबतच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) अंतर्गत पनवेल-रोहा मार्ग दिघीशी जोडला जाणार आहे. यामुळे कोकण रेल्वेमार्फत दिघी बंदर दक्षिणेकडे केरळपर्यंत, तर उत्तरेकडे दिल्लीपर्यंत जोडले जाईल. ही योजना ३६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याची कामे सुरू झाली असली, तरी वेग कायम असावा, अशी अपेक्षा कलंत्री यांनी व्यक्त केली.>स्वस्त जलवाहतूक दुर्लक्षितकुठल्याही प्रकारच्या माल वाहतुकीत जलवाहतूक सर्वात स्वस्त असते. रस्तेमार्गे जिथे २.५० रुपये प्रती किमी खर्च येतो, तिथे जलवाहतुकीचा खर्च हा फक्त २५ पैसे प्रती किमी आहे. अशावेळी केवळ पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने दिघी पोर्टसारख्या बंदरावरुन फक्त दोन लाख टन मालाची उलाढाल होत आहे. त्यातही ७० टक्क्याहून आयात आहे. निर्यातीचा आकडा आणखी कमी आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई