शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
5
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
6
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
7
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
8
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
9
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
10
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
11
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
12
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
13
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
14
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
15
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
16
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
17
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
18
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
19
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
20
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव

दिघावासीयांना मिळाला तात्पुरता दिलासा

By admin | Updated: June 16, 2016 04:19 IST

नवी मुंबईतील दिघा येथे बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली पांडुरंग इमारत ३१ जुलैपर्यंत न पाडण्याचे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले, तसेच दिघा येथील बेकायदा

मुंबई : नवी मुंबईतील दिघा येथे बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली पांडुरंग इमारत ३१ जुलैपर्यंत न पाडण्याचे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले, तसेच दिघा येथील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासंदर्भात धोरण आखण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयाने संमती दर्शवली. आता पांडुरंग इमारतीपाठोपाठ सर्वच इमारतींतील रहिवासी बचावासाठी सर्वोच्च न्यायालायत धाव घेण्याची शक्यता आहे. मात्र त्याच वेळी बुधवारी कमलाकर इमारतीमधील रहिवासी कारवाईच्या कचाट्यात सापडले.दिघा येथे एमआयडीसीच्या भूखंडावर ९९ इमारती बेकायदा उभारण्यात आल्या आहेत. एका जनहित याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने या सर्व बेकायदा इमारतींवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश एमआयडीसीला दिला, तर कोर्ट रिसिव्हरना इमारतींचा ताबा घेण्याचे आदेश दिले. इमारतींचा ताबा घेतल्यानंतर एमआयडीसी या इमारती जमीनदोस्त करणार आहे. एमआयडीसीने आतापर्यंत आठ इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. पावसाळा सुरू झाल्याने काही काळ इमारतीला संरक्षण द्यावे, अशी मागणी पांडुरंग इमारतीच्या सुमारे ५० रहिवाशांनी उच्च न्यायालयाकडे केली. त्यावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारने बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी धोरण आखले, तरी त्या धोरणानुसार तुम्ही संरक्षण मागणार नाही, असे हमीपत्र पांडुरंग इमारतीच्या रहिवाशांना देण्याचे निर्देश दिले. मात्र, रहिवाशांनी असे हमीपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे उच्च न्यायालयाने एमआयडीसीला या इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला पांडुरंग इमारतीच्या रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. ‘लहान मुले व वृद्धांना ऐन पावसाळ्यात बेघर करण्यात येईल, तसेच पावसाळ्यात बेकायदा बांधकामांवर कारवाई करू नये, असे राज्य सरकारचे २००१ चे परिपत्रक आहे. असे असतानाही आमच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे,’ असा युक्तिवाद पांडुरंग इमारतीच्या रहिवाशांच्या वतीने अ‍ॅड. हर्षद भडभडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे केला.अ‍ॅड. भडभडे यांच्या म्हणण्यास खुद्द राज्य सरकारनेही पाठिंबा दिला. राज्य सरकार लवकरच बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासंबंधी ठोस धोरण आखणार आहे, तसेच पावसाळ्यात बेकायदा बांधकामे न पाडण्यासंबंधी सरकारचे परिपत्रक असल्याचेही सरकारी वकिलांनी न्या. आदर्श कुमार गोयल व न्या. एल. नागेस्वर राव यांच्या खंडपीठाला सांगितले. बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी धोरण आखण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला संमती दर्शवत, खंडपीठाने पांडुरंग इमारत ३१ जुलैपर्यंत न पाडण्याचे आदेश सरकारला दिले. सरकारचे धोरण मनमानी असल्याचेही उच्च न्यायालयाने म्हटले होते. आता अन्यही इमारती सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे, तसेच सरकारलाही बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी जुलैपर्यंत धोरण आखणे भाग आहे. (प्रतिनिधी) पांडुरंग इमारत बचावली, ‘कमलाकर’ला सीलठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिकेतील विरोध पक्षनेते विजय चौगुले यांनी रहिवाशांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बुधवारी सुनावणी होऊन न्यायालयाने पांडुरंग अपार्टमेंटवरील कारवाईला ३१ जुलैपर्यंत स्थगिती दिली. परंतु कमलाकर अपार्टमेंटला सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने कोर्ट रिसिव्हरने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत, बुधवारी ही इमारत रिकामी करून तिला सील ठोकले. ‘कमलाकर’वासी झाले बेघरसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत, कमलाकर अपार्टमेंटलाही दिलासा मिळावा, यासाठी सेनेचे वकील अ‍ॅड. हर्षद भडभडे यांनी रहिवाशांच्या वतीने उच्च न्यायालयात अर्ज सादर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले, परंतु वेळेत अर्ज सादर न झाल्याने, कोर्ट रिसिव्हरने अखेर या इमारतीला सील ठोकल्याने या इमारतीतील रहिवासी बुधवारी रस्त्यावर आले.