शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यांवरील बांधकामांच्या कारवाईवरून प्रशासनात मतभेद

By admin | Updated: April 26, 2016 04:16 IST

येत्या दीड महिन्यावर पावसाळा आला असताना शहरातील धोकादायक इमारतींबरोबरच नाल्यांवरील बांधकामांचा मुद्दाही आता चर्चेत आला आहे

ठाणे : येत्या दीड महिन्यावर पावसाळा आला असताना शहरातील धोकादायक इमारतींबरोबरच नाल्यांवरील बांधकामांचा मुद्दाही आता चर्चेत आला आहे. या बांधकामांवर सरसकट कारवाई करण्याची मागणी भाजपा आणि काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी महासभेत केली. सरसकट कारवाई केली तर त्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी तेवढी घरे पालिकेकडे नसल्याने ती कशी करायची, असा सवाल पालिका प्रशासनाने उपस्थित केला. तर, पुनर्वसनाची जबाबदारी पालिका घेणार नाही, असा ठराव करण्याची भूमिका पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेताच सर्वच लोकप्रतिनिधींनी आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कारवाईच्या या मुद्यालाच बगल देऊन हा विषयच बंद केला.बुधवारच्या महासभेत काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे आणि भाजपाचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी नाल्यांवरील बांधकामांवर कारवाई कधी करणार, असा सवाल केला होता. परंतु, कारवाई करण्यास काहीच अडचण नसल्याचे सांगून आयुक्त जयस्वाल यांनी ती केल्यानंतर सुमारे १० हजारांच्यावर रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. सध्या पालिकेकडे तेवढी घरेच नसल्याने त्यांचे पुनर्वसन पालिका करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, यापूर्वीच नाल्यांवरील बांधकामे निष्कासित करण्याचा ठराव झाला असल्याची आठवणही पाटणकर यांनी प्रशासनाला करून दिली. त्यामुळे त्याचे काय करणार, असा सवालही त्यांनी केला. नाल्यांच्या दोन्ही बाजूंस सहा मीटर सोडून तरी किमान कारवाई करावी, असा सल्लाही दिला किंवा जी बांधकामे संपूर्णपणे नाल्यातच आहेत, अशांवर तरी किमान ती करावी, अशी मागणी केली.पाटणकर आणि शिंदे हे दोन्ही नगरसेवक या मुद्यावरुन आक्रमक झाले होते. त्यानुसार, पुन्हा आयुक्तांनी प्रशासनाची बाजू मांडताना कारवाई करण्यास पालिका तयार आहे. परंतु, पालिका त्या रहिवाशांचे पुनर्वसन करणार नाही, अशी गुगली टाकून तसा ठराव करावा, अशी सूचना त्यांनी केली. (प्रतिनिधी)