शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे डिझेलचे दीड कोटींचे पेमेंट गेले कामगारांच्या पगार खात्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 18:21 IST

एसटी प्रशासनाची एकच धावपळ.

ठळक मुद्देएसटी प्रशासनाची एकच धावपळ.

नरेश पवारवडखळ : एसटीच्या रायगड विभागीय कार्यालयांमध्ये डिझेल करिता ठेवलेले दीड कोटी रुपये  शेकडो कर्मचाऱ्यांच्या पगाराकरीता वापरल्याची धक्कादायक घटना रामवाडी, पेण येथील विभागीय कार्यालयातून आज घडली. मात्र चूक लक्षात येताच काही कालावधीत ही रक्कम परत घेण्यात आल्याने डिझेल अभावी एसटीचा चक्का जाम होण्याची मोठी नामुष्की टळली.

एसटीचे रायगड विभागीय कार्यालय पेण येथे असून या कार्यालयातील अकाउंट डिपार्टमेंटने एसटीला रोज लागणाऱ्या डिझेल करिता ठेवलेले सुमारे दीड कोटी रुपये डिझेलसाठी न वापरता शेकडो कामगारांच्या पगारासाठी वापरण्यात आले. मात्र काही वेळातच लेखा शाखेतील अधिकाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट येताच ऑनलाईन केलेले पगार परत घेण्यासाठी अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली.

लेखा शाखेतील अधिकारी, स्वतः विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी संबंधित बँकांशी संपर्क साधून सदरची रक्कम परत मागवून घेतल्याने डिझेल अभावी एस. टी. बंद होण्याचा धोका टळला खरा, परंतु अधिकाऱ्यांची बेपर्वाई समोर आली आहे.

रायगड जिल्ह्यातील एसटी महामंडळाला रोजचे लागणाऱ्या डिझेलचे ऑनलाईन पेमेंट करताना चुकून कामगारांच्या पगारात ही रक्कम गेली. मात्र काही वेळातच लेखाधिकारी यांच्या ही चूक लक्षात आल्याने तात्काळ हे पेमेंट परत घेण्यात आले आहे. यामध्ये कोणताही घोळ झालेला नाही. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल. अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक रायगड

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPetrolपेट्रोलDieselडिझेल