नवी दिल्ली - मध्यरात्रीपासून डिझेलच्या किमतीमध्ये १ रुपया ९ पैशांची वाढ झाली आहे. ही दरवाढ स्थानिक कर वगळून असून, करांचा हिशोब करता विभागनिहाय डिझेलच्या किमतीमध्ये दीड रुपयापर्यंत वाढ झाली आहे. अंशत: नियंत्रणमुक्त असलेल्या डिझेलच्या किमतीमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून वाढ झाली नव्हती. यामुळे तेल कंपन्यांचा डिझेलमधील प्रति लिटर तोटा ६ रुपये ८० पैशांवर पोहोचला होता. निवडणुकांचा शेवटचा टप्पा पूर्ण होताच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. जानेवारी २०१३ पासून डिझेलच्या किमतीमध्ये प्रति महिना ५० पैशांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत डिझेलच्या किमतीत ८ रुपयांची झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मध्यरात्रीपासून डिझेलच्या किमतीत १ रुपया ९ पैशांची वाढ
By admin | Updated: May 13, 2014 03:21 IST