शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

मुंबईत १२ ठिकाणी डायलिसीस केंद्र उभारणार

By admin | Updated: July 20, 2016 02:16 IST

महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते व मध्यवर्ती खरेदी खात्याद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर १२ ठिकाणी डायलिसीस केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे.

मुंबई : महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते व मध्यवर्ती खरेदी खात्याद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर १२ ठिकाणी डायलिसीस केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. या अंतर्गत संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या स्वयंसेवी संस्था, कंपन्या, व्यवसायिक आस्थापनांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार, महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या १२ ठिकाणी १९९ डायलिसीस यंत्रे बसवण्यात येणार आहेत. या प्रत्येक यंत्राद्वारे दिवसाला साधारणपणे २ वेळा डायलिसीस करणे शक्य आहे. त्यामुळे दिवसाला ३९८ रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ठिकाणी डायलिसीस यंत्र बसविणे, त्यासाठी आवश्यक ते सर्व परिरक्षण (मेंटेनन्स) करणे, डायलिसीस करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देणे या बाबींचे नियोजन व व्यवस्थापन करणे यशस्वी निविदाकारांना (कंत्राटदारांना) बंधनकारक असणार आहे. ही सुविधा दर महिन्याला साधारणपणे किमान २५ दिवस रुग्णांसाठी कार्यरत ठेवणे कंत्राटदारांना बंधनकारक असणार आहे. महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या १२ ठिकाणी १९९ डायलिसीस यंत्र बसविणे अपेक्षित असणार आहे. या प्रत्येक यंत्राद्वारे दिवसाला साधारणपणे २ वेळा डायलिसीस करणे शक्य असल्याने, १९९ यंत्रांद्वारे दिवसाला ३९८ रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळेल. म्हणजेच, १९९ यंत्रांद्वारे महिन्याला साधारणपणे १० हजार वेळा डायलिसीस सुविधा देणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)>महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डायलिसीस करण्यासाठी जेवढे शुल्क आकारले जाते, तेवढ्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क या केंद्रांमध्ये आकारण्यात येणार नाही. सध्या डायलिसीससाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ३५० रुपये आकारले जातात.निविदाप्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे, पात्र असणारे जे निविदाकार रुग्णांकडून घेण्यात येणाऱ्या प्रस्तावित शुल्काबाबत सर्वात कमी रकमेची बोली लावतील, त्यांची या प्रक्रियेत यशस्वी निविदाकार म्हणून निवड होईल.उदाहरणार्थ : ३५० रुपयांपेक्षाही कमी पैसे आकारून रुग्णांना डायलिसीस सुविधा देण्यासाठी तयार असणाऱ्यांपैकी जे निविदाकार तुलनेने सर्वात कमी रक्कम आकारतील, ते निविदा प्रक्रियेअंती ‘यशस्वी निविदाकार’ ठरतील. त्यामुळे रुग्णांना महापालिकेच्या निर्धारित शुल्कापेक्षाही कमी दरात डायलिसीस सुविधा मिळेल.>बारा केंद्रांचा तपशीलआयसी कॉलनी, बोरीवली पश्चिममोहिली गाव, साकीनाका, अंधेरी पूर्वमन्नन इमारत, आनंद नगर, दहिसर पूर्वसेंट जॉन अलाईड सहकारी गृहनिर्माण संस्था, एच पश्चिमवांद्रे गाव, वांद्रे पश्चिमहरियाली गाव, पवईओशिवारा गाव, अंधेरी पश्चिमएकसर गाव, बोरीवली पश्चिमव्ही.एन.देसाई रुग्णालयज्योतिबा फुले रुग्णालयमाँ रुग्णालयभाभा रुग्णालय (कुर्ला)