शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

धुळे - चायना लायटिंगवर अघोषित बहिष्कार

By admin | Updated: October 18, 2016 20:54 IST

दिवाळीनिमित्त दरवर्षी चायना लायटिंगला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते, परंतु चीनच्या भारतविरोधी भूमिकेमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 18 - दिवाळीनिमित्त दरवर्षी चायना लायटिंगला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते, परंतु चीनच्या भारतविरोधी भूमिकेमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याचा परिणाम बाजारापेठेमध्ये दिसू लागला आहे. ग्राहकांनी चायना लायटिंगकडे पाठ फिरवलेली आहे, असे विक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यंदा चायना लाईटींगची विक्री आताच ५० टक्केवर आली आहे. ग्राहकांचा चायना लाईटींगवर अघोषित बहिष्कार बघता पुढे यात आणखी वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.५० टक्के जास्त फटका दिवाळीत यावर्षी चायना लायटिंगची विक्री सुरुवातीलाच गेल्यावर्षाच्या तुलनेत ५० टक्क्याने घट झाली आहे. जिल्ह्यामध्ये सुमारे एक ते दीड कोटी रुपयाची चायना लायटिंगची उलाढाल होते. ती निम्म्यावर आली आहे. अघोषित बहिष्कारउरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. याला सर्व देशांकडून चांगला पाठिंबा मिळत आहे, परंतु चीन अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला मदत करत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सुशिक्षित लोक आता चायना वस्तु घेण्याचे टाळू लागले आहेत, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.भारतीय कंपन्यांचेही दर कमीदिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय कंपन्यांनीही लायटिंगचे रेट कमी केले आहे. चायना लायटिंगच्या तोडीस तोड देणारी भारतीय कंपन्यांची लायटिंग बाजारात आलेली आहे. तसेच चायना लायटिंग ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’ असून भारतीय कंपन्यांचा माल टिकाऊ असल्याचेही ग्राहक व विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुकानामध्ये ग्राहक भारतीय कंपन्यांचीच लायटिंग खरेदी करत असताना दिसून येत आहे.चायनाचा स्टॉक निम्म्यावरबाजारातील मागणीचा अंदाज बांधून विक्रेत्यांनीही गेल्यावर्षीपेक्षा लायटिंगचा निम्मा स्टॉक मागविला आहे. जिल्ह्यातील विक्रेते जेथून माल खरेदी करतात, त्याठिकाणच्या होलहोल विक्रेत्यांनीही यावर्षी चायना स्टॉक कमी केला असून, भारतीय कंपन्यांचा स्टॉक वाढविला आहे. बाजाराची सद्यस्थितीचायना लायटिंग २० रुपयापासून ५०० रुपयापर्यंत तर इंडियन लायटिंग ५० रुपयापासून ३०० रुपयापर्यंत बाजारामध्ये उपलब्ध आहे. वीजेची बचत होत असल्याने एलईडी बल्बच्या लायटिंगला जास्त मागणी आहे.सेलवरील दिव्यांची लायटिंगविविध भारतीय कंपनीचे सेलवरील दिव्यांची लायटिंगही बाजारामध्ये आलेली आहे. लोकांची दिव्यांच्या माळा रोटेटिंग बल्ब लायटिंगला जास्त मागणी असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी लायटिंगमध्ये विविध प्रकार बाजारात आले आहेत.महाग असू द्या, पण इंडियन द्यास्वदेशीबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली दिसून येत आहे. ‘महाग असू द्या, पण भारतीय कंपनीचीच लायटिंग द्या’ अशी मागणी ग्राहक स्वत:हून करू लागले आहेत. अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. त्यामुळे चायना लायटिंगला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. चायना लायटिंग तोडीस-तोड म्हणून भारतीय कंपन्याही मोठ्या प्रमाणात बाजारात उतरल्या आहेत. त्यामुळे मागविलेला स्टॉकही संपतो का नाही, याबाबत विक्रेत्यांमध्ये साशंकता आहे.यावर्षी चायना लायटिंग मागणी खूपच कमी आहे. ग्राहक स्वत:हून देशी कंपन्यांचा माल मागत आहेत. त्यामुळे वर्षी चायना मालाची विक्री निम्म्यापेक्षा जास्त घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे चायना माल कमी मागविला आहे. - अमित मंदान, विक्रेतेनव्वद टक्केपेक्षा जास्त ग्राहक चायना लायटिंग नको म्हणून सांगत आहेत. कमी किंमत असल्यामुळे काही लोक मजबूरी म्हणून हा माल खरेदी करतात. भारतीय कंपन्यांच्या लायटिंगलाच ग्राहकांची जास्त मागणी आहे.- दिलीप जैन, विक्रेतेचायना लायटिंगपेक्षा आम्हाला भारतीय कंपन्यांची लायटिंग चांगली वाटते. स्वदेशी मालाकडे लोक वळले तर आपल्या देशाचाच फायदा होईल. तसेच आपल्या देशातील चलन बाहेर जाण्याचे थांबेल.- विकास पाटील, ग्राहकउरी येथे भारतीय सैनिक तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची सर्वांचाच मनात खदखद आहे. आपण ज्यांच्या वस्तु विकत घेतो, त्यांनाच आपल्याविषयी संवेदना नसेल तर आपण भारतीय वस्तुच खरेदीवर बहिष्कार टाकला पाहिजे.- अशोक चौधरी, ग्राहक