शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळे: कुख्यात गुंड गुड्डया हत्याप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 15:32 IST

कुख्यात गुंड रफिकोद्दीन शफिकोद्दीन शेख उर्फ गुड्डया याच्या हत्याप्रकरणी दुसऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 24 -  कुख्यात गुंड रफिकोद्दीन शफिकोद्दीन शेख उर्फ गुड्डया याच्या हत्याप्रकरणी दुसऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दादू देवरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणातील बरेच आरोपी अजून फरार असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल असा दावा पोलिसांनी केला आहे.
 
शहरातील कराचीवाला खुंट चौकात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रफिकोद्दीन शफिकोद्दीन शेख उर्फ गुड्डया या कुख्यात गुंडाची हत्येतील संशयित आरोपी सीसीटीव्ही फुटेजवरुन निष्पन्न झाले आहेत. हा खून गोयर परिवारातील सदस्यांनी केल्याचा निष्पन्न झाल्याने रवींद्र उर्फ राजा भद्रा देवरे, विक्रम उर्फ विक्की गोयरसह आठ ते दहा जणांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोडवरील कराचीवाला खुंट चौकातील महापालिकेकडे जाणा-या पारोळा रोडवरील चहाच्या दुकानाजवळ पहाटे साडे सहा वाजेच्या सुमारास कुख्यात गुंड गुड्डय़ा उर्फ रफिकोद्दीन शफिकोद्दीन शेख हा काळ्या रंगाच्या स्कुटरवर आला. याठिकाणी आधीच त्याची वाट  बसलेल्या  8 ते 10 जणाना  तो भेटला. याठिकाणी टोळीतील काही लोकांशी गुड्डयाचा वाद झाला. यावेळी टोळीतील एकाने अचानक त्याच्यावर पिस्तुल रोखली आणि गोळी झाडली़ गोळी लागल्याने गुडय़ा जखमी झाला. दरम्यान, टोळीतील अन्य लोकांनी त्याच्यावर तलवार व चॉपरने सपासप वार केल़े गंभीररित्या जखमी झाल्याने गुड्डया जमिनीवर कोसळला. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर हल्लेखोर आग्रारोडर्पयत पायी गेले. त्याठिकाणी उभ्या केलेल्या एका गाडीत बसून ते पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
(धुळ्यातील गुंडाचा खून प्रकरणी संशयितांवर बक्षीस)
 (तडीपार गुंडांकडून आष्टीत चोरी)
रोज पहाटे मॉर्निग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना या घटनेमुळे धक्का बसला. भरचौकात अवघ्या काही मिनिटात घडलेला थरार पाहून स्तब्ध  झाल़े तर घटनेनंतर ही बातमी वा:यासारखी शहरात पसरल्याने  घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती.
याप्रकरणी शेख फारुक फत्तू फौजी (46) रा़ जामा मशिद, धुळे यांनी मंगळवारी धुळे शहर पोलिसात दुपारी फिर्याद दिली. त्यानुसार रवींद्र उर्फ राजा भद्रा देवरे, विक्रम उर्फ विक्की गोयर, विलास उर्फ छोटा पापा श्याम गोयर, भीमा रमेश देवरे, दादू रमेश देवरे, श्याम गोयर आणि अन्य तीन ते चार जण यांच्यावर संशय व्यक्त केला आह़े त्यांच्याविरुध्द भादंवि कलम 302, 504, 506, 120 ब आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
गुड्डयावर 35 गुन्हे दाखल होते-
मयत गुड्डया याच्यावर धुळे शहरासह कोपरगाव व अन्य ठिकाणी वेगवेगळ्या कलमान्वये 35 गुन्हे दाखल आहेत़ तो मनपा जळीतकांडातील प्रमुख संशयित आरोपी होता. त्या जळीतकांडापासूनच तो जास्त प्रकाशझोतात आला होता. त्याची शहरातील व्यापा:यांमध्येही दहशत होती.