शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावरून धनगर समाजाची निराशा

By admin | Updated: April 8, 2017 01:45 IST

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने धनगर समाजाची घोर निराशा केली

इंदापूर : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने धनगर समाजाची घोर निराशा केली आहे. त्यामुळे आरक्षणाची तारीख निश्चित करण्यास भाग पाडण्यासाठी धनगर समाज राज्यस्तरीय आंदोलन सुरू करणार आहे, अशी माहिती आमदार राम वडकुते यांनी मंगळवारी रात्री येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.ते म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला सवलतींचा अधिकार दिला आहे. गेल्या ६८ वर्षांपासून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. धनगड व धनगर या शब्दांमधील छपाईतील चुकीमुळे आम्हाला आरक्षण व इतर सवलतींपासून वंचित रहावे लागले आहे. सवलती व आरक्षण मिळावे, यासाठी १०-१५ वर्षांपासून आम्ही आंदोलनात्मकलढा उभा केला आहे.भाजपाला सत्ता मिळाली, मात्र आश्वासनाचा विसर पडला. नंतर ज्यावेळी आम्ही त्यांना आठवण काढून देऊ त्यावेळी वेळ मारून नेण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले, असे आमदार वडकुते म्हणाले.धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य डॉ. शशिकांत तरंगे, कृती समितीचे तालुकाध्यक्ष माऊली वाघमोडे, सदस्य भगवान कोळेकर, सोमनाथ नरुटे, विष्णू पाटील, वैभव तरंगे उपस्थित होते.सन २०१९च्या निवडणुकीची तयारी करायला सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासदार व मंत्र्यांना इथून पुढे आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. आधी धनगर आरक्षण मगच निवडणूक, अशी भूमिका धनगर समाजाने घेतली आहे. आरक्षणाची तारीख त्यांनी जाहीर करावी आणि आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी आहे. त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार आहोत.