शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 06:17 IST

आरक्षणाचा अहवाल सकारात्मक

- दीप्ती देशमुख मुंबई : ‘धनगर’ व ‘धनगड’ असा जातींचा घोळ असला तरी महाराष्ट्रात धनगड समाजाचे अस्तित्व नसल्याचे टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सने (टिस) केलेल्या अभ्यासावरून स्पष्ट झाल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात केले.धनगर समाजाला भटक्या व विमुक्त जाती व जमातीत साडेतीन टक्के आरक्षण आहे. मात्र, या समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण मिळावे, यासाठी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच व अन्य काही जणांनी न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी झाली.राज्यात ‘धनगड’ व ओरियान समाजाचे अस्तित्व आहे की नाही, याचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारने ‘टिस’ची नियुक्ती केली होती. ‘टिस’ने या दोन समाजांचा अभ्यास करून ३१ आॅगस्टला राज्य सरकारकडे अहवाल सादर केला. या अहवालाचा अभ्यास करून आदिवासी विकास विभागाचे उपसचिव लक्ष्मीकांत ढोके यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी हे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले.राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणावरून व संशोधनावरून राज्यात धनगड व ओरियान समाजाचे अस्तित्व नाही. मात्र, धनगर समाजाचे आहे, असा निष्कर्ष सरकारने काढला, असे ढोके यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. असेच आरक्षण मागणाऱ्या अन्य याचिकेवरील सुनावणी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे प्रलंबित असल्याने न्या. अभय ओक यांनी याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला व मुख्य न्यायाधीशांकडून आदेश घेण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले.सरकारची उपसमितीकाही दिवसांपूर्वी राज्य सरकारने टिसच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी उपसमिती नेमली आहे.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षण