शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंसह १११ जण ‘वाँटेड’!

By admin | Updated: July 12, 2016 04:08 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात विशेष पथकाने सोमवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात विशेष पथकाने सोमवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित आणि खा. रजनी पाटील यांच्यासह १११ जणांना वाँटेड घोषित केले आहे. जिल्हा बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात १३१ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी १२८ गुन्ह्यांचा अंतिम अहवाल न्यायालयात सादर करण्यात आलेला आहे, तर ३ गुन्हे प्रलंबित होते. त्याचा तपासही विशेष पथकाने सोमवारी पूर्ण करून केज येथील विखे पाटील सहकारी साखर कारखाना, अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखाना व संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणीच्या संचालकांच्या विरोधात नव्याने गुन्हे दाखल केले. २८ जून रोजी विशेष पथकाने यातील सर्व आरोपींना नोटीस पाठवून जबाबासाठी हजर राहण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार ८३ जणांचे जबाब नोंदविण्यात आले. दोषारोपपत्र दाखल करतेवेळी त्यांना न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २९९प्रमाणे या सर्वांना वाँटेड जाहीर करण्यात आले. दोषारोपपत्रासोबतच न्यायालयात कलम ८२प्रमाणे फरार घोषित करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली. विशेष पथकाने केलेल्या तपासाचा अहवाल १३ जुलै रोजी सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिलेले आहेत. त्यापूर्वीच दोषारोपपत्र सादर करून विशेष पथकाने तपास पूर्ण केला आहे. नोंदविलेले जबाब, दोषारोपपत्र व तपासाच्या अनुषंगाने सर्वंकष अहवाल विशेष पथक खंडपीठात सादर करणार आहे. (प्रतिनिधी)कुणकुण लागताच आरोपी दिंडीत!या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असल्याची कुणकुण लागताच काहींनी आपले मोबाइल बंद ठेवले होते, तर काही जण ‘आउट आॅफ कव्हरेज’ होते. पोलिसांची पथके काहींच्या घरी गेली तेव्हा ‘ते घरी नाहीत, दिंडीत गेले आहेत,’ असे उत्तर मिळाल्याचे सूत्रांनीआरोपींच्या शोधार्थ २७ पथके रवाना केली होती. त्यापैकी १० पथके जिल्ह्याबाहेर, तर १७ जिल्ह्यात फिरत होती; मात्र त्यापैकी एकालाही यश आले नाही. पथकातील काही अधिकारी आरोपींच्या पुणे, मुंबई येथील निवासस्थानी जाऊन आले.फरार नाही; विदेश दौऱ्यावर - मुंडेपूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शेतीविषयक अभ्यास दौऱ्यासाठी मी विदेशात आहे. याची माहिती पोलिसांना आहे. मी फरार असण्याचा प्रश्नच नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. बीड बँकेकडून जगमित्र सूतगिरणीने घेतलेल्या कर्जप्रकरणाच्या तपासास नेहमीच सहकार्य केले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मालमत्तांवर टाचगुन्ह्यांतील थकबाकीदारांच्या मालमत्तांवर लवकरच टाच येणार आहे. पोलिसांनी बँकेचा पैसा परत मिळविण्यासाठी सर्व थकबाकीदार आरोपींच्या मालमत्ता जप्तीसाठी महसूल व इतर संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला आहे.क्रिमिनल लॉ अमेंडमेंट आॅर्डिनन्स १९४४नुसार ही कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक पारसकर यांनी सांगितले. थकबाकीदारांमध्ये बड्या राजकीय मंडळींचाही समावेश आहे. थकबाकीदार संस्थांच्या संचालकांसह जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालकांनाही पैसे न भरल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. २६८० पानांचे दोषारोपपत्र विखे पाटील सहकारी साखर कारखाना, अंबा सहकारी साखर कारखाना, जगमित्र नागा सूतगिरणी हा घोटाळा ३२ कोटींचा आहे. अनुक्रमे १०९०, ३५९ व १२३१ पानांचे दोषारोपपत्र सोमवारी पोलिसांनी न्यायालयात सादर केले. वाढलेल्या आरोपींच्या गुन्ह्यांत ४०९, ४१८ ही कलमे वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेप किंवा १० वर्षे शिक्षा होऊ शकते.