शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण उपसंचालक कार्यालयात ‘धुडगूस’

By admin | Updated: July 23, 2016 04:04 IST

करावीला आॅफलाईन प्रवेश मिळावा देण्याच्या नावाखाली काही दलाल शिक्षण उपसंचालक कार्यालयात येणाऱ्या पालकांना चिथावणी देत असल्याचे निदर्शनास आले

मुंबई : अकरावीला आॅफलाईन प्रवेश मिळावा देण्याच्या नावाखाली काही दलाल शिक्षण उपसंचालक कार्यालयात येणाऱ्या पालकांना चिथावणी देत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी पालकांनी अशा दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन कार्यालयाने केले आहे. शिवाय अकरावी प्रवेशाचे प्राथमिक वेळापत्रक जाहीर झाले असून लवकरच त्याबद्दलची सविस्तर माहितीही देण्यात येईल, असे उपसंचालक कार्यालयाने सांगितले.अकरावीला आॅनलाईन प्रवेश घेण्यासाठी आवश्यक नोंदणी अर्ज आणि पसंतीक्रम अर्ज अर्धवट भरल्याने काही विद्यार्थ्यांना प्रवेशाला मुकावे लागले होते. याशिवाय काही विद्यार्थ्यांनी मनपसंत महाविद्यालय मिळाले नाही, म्हणून गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही प्रवेश निश्चित केला नव्हता. तर काही विद्यार्थ्यांनी राहत्या घरापासून दूरवर महाविद्यालय मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा खुली केली आहे. मात्र वेळापत्रक जाहीर केल्यानंतर त्याबद्दलची सविस्तर माहिती मिळत नसल्याने पालकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा उपसंचालक कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. गर्दीला आवरणे कठीण झाल्याने काही काळासाठी उपसंचालक कार्यालयाचे दरवाजेही बंद करण्यात आले. (प्रतिनिधी)>...म्हणून दलालांची गर्दीउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यावर्षी प्रथमच १०० टक्के अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन पद्धतीने पार पडत आहे. त्यामुळे याआधी आॅफलाईन प्रक्रियेद्वारे पैशांच्या जोरावर श्रीमंतांच्या मुलांना प्रवेश करून देणाऱ्या अनेक दलालांच्या पोटावर पाय पडला आहे. यामध्ये काही महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.असे कर्मचारी आणि दलाल पालकांची दिशाभूल करून त्यांना दाद मागण्यासाठी उपसंचालक कार्यालयात धाडत आहेत. त्यामुळे पालकांनी अशा भ्रष्ट कर्मचारी आणि दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. शिवाय याच कारणासाठी उपसंचालक कार्यालयात येणाऱ्या पालकांना चिथावण्यासाठी दलाल गर्दी करत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.>उपसंचालक कार्यालयाचे पालकांना आवाहन...पहिल्या टप्प्यात गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नव्हता, त्यांच्यासाठी त्याच महाविद्यालयात जागा आहे का? याची माहिती कार्यालय घेत आहे. तसेच जागा रिक्त असल्यास संबंधित विद्यार्थ्याला २५ जुलै रोजी मोबाईलवर आणि विद्यार्थ्याच्या लॉगीनमध्ये एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी अर्जच भरला नव्हता किंवा अर्धवट अर्ज भरला होता, त्यांना ३० जुलै ते २ आॅगस्टदरम्यान अर्ज भरण्याची आणखी एक संधी दिली जाईल. यावेळी विद्यार्थ्याला अर्ज पूर्ण भरावा लागणार आहे.