विरार : येथील पश्चिम भागातील राजोडी गावातील ध्यानाश्रम पासून ते राजोडी चार रस्त्यापर्यंतच्या वसई - विरार महानगरपालिके अंतर्गत असणाऱ्या रस्त्याचे काम रखडलेले आहे. हा रस्ता खूप अरुंद आहे. या रस्त्यावर खूप खडडे् पडले आहेत. त्यामुळे मोठी वाहने आली की वाहतूककोंडी होते. त्यामुळे रस्त्याचे तात्काळ रुंदीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. ध्यानाश्रमपर्यंत एमएमआरडीएच्या माध्यमातून व आमदार विवेक पंडित यांच्या आमदार निधीतून रुंदीकरण होऊन या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. परंतु आता फक्त ५०० ते ६०० मीटर रस्त्याचे काम बाकी आहे. (वार्ताहर)
राजोडी ते ध्यानाश्रम रस्ता खड्डेयुक्त
By admin | Updated: April 29, 2016 04:52 IST