शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

गणेशोत्सवाच्या तयारीसाठी भक्तांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:17 IST

काही दिवसांवर आलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे सर्वांनाच वेध लागलेत.

- रीना चव्हाणकाही दिवसांवर आलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे सर्वांनाच वेध लागलेत. श्री गणेशाचे आगमन होणार या विचाराने घरात प्रसन्न वातावरणाबरोबर सजावट, सफासफाईची तारांबळ उडते. आजकाल बरेच जण नोकरीला असल्याने नोकरी सांभाळून सण, उत्सव साजरे केले जातात. पण वेळ नाही या सबबीखाली हे काम आज नाही तर उद्या- परवा असे आपण टाळतो. नाहीतर शनिवार - रविवार बघू. पण आता गणेशाचे आगमन काही दिवसांवर असल्याने अशी टाळाटाळ करुन चालणार नाही. नाहीतर आयत्यावेळेला तुमचाच गोंधळ होईल.>वेळ निश्चित कराआज वा उद्या आपल्याला काय काम करायचेय याची रुपरेषा आखा. घरातील प्रत्येक खोली स्वच्छ करायची म्हणजे कचरा काढण्याबरोबर लादी स्वच्छ करणे, पडदे, चादरी बदलणे हे आलेच. कारण हे काम आज पूर्ण करायचेय हे ठरविले तरच तुम्ही काम लवकरात लवकर कराल. तसेच बाथरुमच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. कारण यादरम्यान घरात पाहुण्यांची रेलचेल मोठ्याप्रमाणात असते. त्यामुळे बाथरुममधील लादी स्वच्छ ठेवा. तेथील कपाटात आवश्यक त्या वस्तू म्हणजे साबण, नॅपकीन, शॅम्पू,तेल ठेवा, आरसा पुसून घ्या. बाथरुममध्ये दुर्गंध येऊ नये म्हणून एअर फ्रेशनरचे पॅकेट लावा. जेणेकरुन वातावरण सुगंधी राहील.>घराची स्वच्छतानोकरी -व्यवसायानिमित्त बाहेर जाणा-या व्यक्तींनी वेळ नाही असे म्हणून काम पुढे ढकलण्याऐवजी दररोज थोडंथोडं काम करण्याला प्राधान्य द्यावे. निदान ४ -५ दिवस आधी घराची साफसफाई करावी. ज्यामुळे शेवटच्या क्षणी गोंधळ होणार नाही.>कामाची करा विभागणीसण-उत्सव म्हटला की बरीच कामं असतात. विशेषत: श्री गणेशाचे आगमन म्हटले की साफसफाई, सजावट, वेगवेगळे खाद्यपदार्थ बनविणे, येणा-या-जाणा-या पाहुण्यांचा पाहुणचार यामुळे आयत्यावेळी बºयाचशा गोष्टी विसरायला होतात. त्यासाठी कामांची एक यादी बनवून घरातील सदस्यांमध्ये कामे वाटून घ्या.>स्वयंपाकघराची स्वच्छतास्वादिष्ट व्यंजन बनविण्याबरोबर स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे तितकेच गरजेचे आहे. किचन बॉक्स स्वच्छ करा. नको असलेले सामान फेकून द्या. वस्तू जागच्याजागी ठेवा म्हणजे पाहिजे असतील तेव्हा वेळेत मिळतात. कारण श्रीगणेशाचे आगमन झाल्यावर विविध व्यंजन स्वयंपाकघरात बनविले जातात. त्यासाठी आवश्यकत्या वस्तू लगेच मिळणे गरजेचे असते.>धावपळ टाळण्यासाठी वेग वाढवाकाही दिवसांवर बाप्पाचे आगमन आल्याने एक दिवस एक काम करु अशा भ्रमात राहू नका. वेळ थोडा आणि काम जास्त असल्याने कामांचा वेग वाढविणे गरजेचे आहे. जेणेकरुन बाप्पाच्या आगमनाच्यावेळी तुमची धावपळ होणार नाही.>सजावट, आरास करा निश्चितबाजारात वेगवेगळ्या आकारातल्या थर्माकोल, फुलांच्या आरास मिळतात. पण आपल्या कल्पकतेचा उपयोग करुन फुले, माळा, रेशीम लड्या, पताका, लाइटचा उपयोग करुन छान आरास बनविता येते. पण त्यापूर्वी बाप्पाची मूर्ती मखरात की मोकळ्या जागी ठेवणार आहात हे निश्चित करा. कारण मूर्ती ठेवल्यावर आजूबाजूला किती जागा शिल्लक राहते हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जागा लहान असेल तर मखरातील रंगसंगतीच्या भडकपणामुळे बाप्पाचे मूळ सौंदर्य नष्ट होते. जागा मोठी असेल आणि मूर्तीही मोठी असेल तर ती शक्यतो मोकळीच ठेवावी.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव