शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पोहरादेवी येथे भक्तांची मांदियाळी!

By admin | Updated: April 3, 2017 02:17 IST

पाच राज्यांतील भाविक पोहरादेवीत डेरेदाखल

वाशिम, दि. २- रामनवमी आणि संत सेवालाल महाराज जन्मोत्सवानिमित्त बंजारा समाजाची काशी म्हणून भारतभरात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवी येथे भव्य यात्रा भरते. त्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यांमधील भाविक पोहरादेवीत डेरेदाखल झाले आहेत. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्र्यांनीही पोहरादेवीत उपस्थिती दर्शवून संत सेवालाल महाराजांचे दर्शन घेतले.विश्‍वशांतीसाठी अखिल भारतीय बंजारा शक्तिपीठाच्या वतीने २४ मार्चपासून लक्षचंडी महायज्ञ सुरू करण्यात आला आहे. या महायज्ञाची सांगता ३ एप्रिल रोजी होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोहरादेवी येथे जमलेल्या बंजारा समाज बांधवांना त्यांच्या बोलीभाषेतून साद घातली. गेल्या दोन वर्षांंंंंपासून पोहरादेवी येथील यात्रेला येण्याची इच्छा होती, आज ती पूर्ण झाल्याने आनंद झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करताच उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात प्रतिसाद दिला.पोहरादेवी हे ठिकाण देशातील कष्टकरी व श्रमिक जनतेचे श्रद्धास्थान असल्याची भावना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी आहे. अशा या पवित्र धार्मिकस्थळी जो लक्षचंडी यज्ञ सुरु आहे, त्यात अहंकार, व्यसन आणि भ्रष्टाचार याची आहुती देण्याचे आवाहन मुंडे यांनी केले.बोकडबळी प्रथेला ब्रेकसंत सेवालाल महाराजांची समाधी व जगदंबा देवीचे मंदिर असलेल्या पोहरादेवी येथे दरवर्षी रामनवमी व संत सेवालाल महाराज जन्मोत्सवानिमित्त भव्य यात्रा भरते. बोकडबळी प्रथा थांबविण्यासाठी संत, महंत, सामाजिक कार्यकर्ते तथा प्रशासनाने प्रयत्न केले. त्यामुळे गत तीन ते चार वर्षांंंंपासून या यात्रेत जगदंबा माता मंदिर परिसरात बोकडबळी प्रथा बहुतांश संपुष्टात आली आहे. ज्या देवीच्या मंदिरासमोर रक्ताचे पाट वाहत असत तिथे आता लक्षचंडी यज्ञ होमहवनाचे आयोजन केले जात असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.