ब्रrानंद जाधव - बुलडाणा
दिल्लीत ‘नरेंद्र’ आणि महाराष्ट्रात ‘देवेंद्र’, हे मध्यंतरीच्या काळात चर्चेला आलेले समीकरण प्रत्यक्षात साकारले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील राज्यकारणाला ‘इंद्र’ दरबाराचे वलय लाभणार आहे. कारण इंद्ररूपी नामसाधम्र्य असलेल्या 11 आमदारांना जनता जनार्दनाने राज्याच्या विधिमंडळरूपी दरबारात धाडले आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. नंतर अल्पावधीतच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. तेव्हापासूनच दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असा प्रचार सोशल मीडियावर सुरू झाला. विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा उदयास आला आणि विधिमंडळात या पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी देवेंद्र फडणवीसांना मिळाली. त्यामुळे दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र, ही भाजपा कार्यकत्र्याची घोषणा आता लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. एक विलक्षण योग म्हणजे देवेंद्रप्रमाणोच नावात इंद्र समाविष्ट असलेले फडणवीस यांच्याव्यतिरिक्त आणखी 10 आमदार आहेत. या दरबारात नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून विजयी झालेले स्वत: देवेंद्र फडणवीस तसेच कल्याण पश्चिममधून नरेंद्र पवार, डोंबिवलीमधून रवींद्र चव्हाण, मीरा भाईदरमधून नरेंद्र मेहता, कारंजामधून राजेंद्र पाटणी, उमरखेडमधून राजेंद्र नजरधाने, तर शिवसेनेचे जोगेश्वरीमधून रवींद्र वायकर यांचा समावेश राहणार आहे. भाजपाच्या या इंद्रांव्यतिरिक्त नामसाधम्र्य लाभलेले इतर पक्षांचेही चार आमदार आहेत. यात वसईमधून हितेंद्र ठाकूर, धामणगांव रेल्वेमधून वीरेंद्र जगताप, सातारामधून शिवेंद्र भोसले आणि मुंब्रा-कळवामधून जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे. 11 पैकी सात इंद्र सत्तेचा गाडा हाकणार आहेत, तर चार इंद्र विरोधी बाकावर बसणार
आहेत.