शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

विदर्भावर देवेंद्र प्रसन्न

By admin | Updated: December 20, 2014 02:46 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विदर्भाचे मागासलेपण दूर करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा विधानसभेत केली.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विदर्भाचे मागासलेपण दूर करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा विधानसभेत केली. या योजना निश्चित वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार करताना महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प २०१७ मध्ये पूर्ण करू, विदर्भातील १०२ सिंचन प्रकल्प येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले. रस्ते, सिंचन, विपणन, हवाई वाहतूक, पर्यटन, उद्योग यावर फोकस असलेल्या योजना त्यांनी जाहीर केल्या. विदर्भात आतापर्यंत नागपूरपुरते मर्यादित असलेले हवाईविश्व फडणवीस यांनी अमरावती, अकोल्यासाठी खुले करण्याची घोषणा केली. दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, विजय वडेट्टीवार या ज्येष्ठ सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर दोन दिवसांच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिले. आघाडी सरकारने दहा वर्षांत न घेतलेले निर्णय आम्ही दहा दिवसांत घेतले. आमच्याकडे आघाडीसारखी ओढाताण होत नाही. विदर्भाच्या विकासाची तळमळ गेल्या १५ वर्षांत दिसली नाही आता ती कृतीतून दिसेल, असा चिमटाही त्यांनी काढला. अमरावती विमानतळाचा तीन वर्षांत विस्तार अमरावतीचे (बेलोरा) विमानतळ वर्षभर सारख्याच क्षमतेने चालेल अशी व्यवस्था निर्माण केली जाईल. तेथे रात्रीच्या लँडिंगची सोय केली जाईल. तसेच, तेथील धावपट्टी २३०० बाय ६० मीटर इतकी वाढविली जाईल. या बाबत विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा झाली असून तीन वर्षांत विस्ताराचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर तेथे बोर्इंग, एअरबस ३२० सारखी जम्बो विमाने उतरू लागतील आणि विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. अकोला आणि शिर्डी विमानतळाचा विकास करण्यात येईल, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)