शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
4
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
5
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
6
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
7
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
8
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
9
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
10
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
11
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
12
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
13
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
14
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
15
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
16
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
17
दिवाळी पाडवा २०२५: १० राशींना गुड न्यूज, समस्या संपतील; भाग्योदय-भरभराट, इच्छापूर्तीचा काळ!
18
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
19
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप

देवेंद्र फडणवीस स्वत: भावी मंत्र्यांना आज दुपारनंतर फोन करणार;  उद्या नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:24 IST

धाकधूक : कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाकारली जाणार? भाजपची अंतिम यादी पंतप्रधान माेदींकडे; शिंदेसेना, अजित पवार गटाची यादी तयार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राजभवनात दुपारी होणार आहे. १६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी होईल. १९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनच्या हिरवळीवर रविवारी दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. 

मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाकारली जाणार याची राजकीय वर्तुळात दिवसभर जोरदार चर्चा होती. मंत्रिपद ज्यांना दिले जाणार आहे त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दुपारनंतर फोन करणार आहेत. ‘तुम्हाला शपथ घेण्यासाठी यायचे आहे’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरच मंत्रिपद मिळणार हे नक्की मानले जाते.

आधी तारीख ठरली १४ नंतर १५ डिसेंबरशपथविधी १४ डिसेंबरला मुंबईच्या राजभवनवर करण्याचे आधी ठरले होते. सूत्रांनी सांगितले, की मुख्यमंत्री कार्यालयाने राजभवनला शपथविधीची तयारी करण्याची विनंती करणारे पत्रदेखील दिले होते. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये तयारीही सुरू झाली होती. शुक्रवारी दुपारी राजभवनला मुख्यमंत्री कार्यालय आणि राजशिष्टाचार विभागाने कळविले, की शपथविधी समारंभ हा नागपूरला होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याची विनंती केली.

पंतप्रधान मोदींच्या मान्यतेची प्रतीक्षाn१४ तारखेचा शपथविधी १५ रोजी घेण्याचे का ठरले, याबाबत माहिती घेतली असता समजते, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी मंत्र्यांची यादी तयार केली तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंजुरी मोदी यांच्या व्यग्रतेमुळे मिळू शकली नाही. ती शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळी मिळण्याची शक्यता आहे. nभाजपच्या यादीमध्ये प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर असेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे घेतले जातील. जुन्या सर्वच मंत्र्यांना संधी मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. फडणवीस यांनी सर्व नावांची शिफारस केली तरी जुन्या चेहऱ्यांबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान मोदी घेतील, असे सूत्रांनी सांगितले.

बावनकुळेंनी केली एकनाथ शिंदेंशी चर्चाnभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते शिंदेंना भेटले आणि नंतर पुन्हा फडणवीस यांच्या भेटीला गेले. संभाव्य मंत्री आणि खाती याबाबत या चर्चेत अंतिम रूप देण्यात आल्याची माहिती आहे. nशिंदे यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या मंत्र्यांची नावे अंतिम करून ती मुख्यमंत्री फडणवीस यांना कळविली, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षातील तीन-चार ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या मंत्र्यांच्या यादीला अंतिम स्वरूप दिले आणि फडणवीस यांना त्याबाबत कळविल्याचीही माहिती आहे.यापूर्वी नागपूर, पुण्यातही झाला हाेता शपथविधी /पान ८ वर

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार