शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांची नवी खेळी! लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘मिशन ४५’, शिवसेनेच्या १० जागा रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 12:30 IST

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निश्चित केले असून, त्यासाठी आगामी १८ महिन्यांत एक मिशन राबविले जाणार आहे.

मुंबई :

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निश्चित केले असून, त्यासाठी आगामी १८ महिन्यांत एक मिशन राबविले जाणार आहे. त्यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक गुरुवारी मुंबईत झाली. शिवसेनेकडे असलेल्या १० जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मिशनचे समन्वयक माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री करणार राज्यात दौरेज्या जागा जिंकल्या आहेत, त्यावर आमचं लक्ष आहेच. मात्र, ज्या जागा जिंकायच्या आहेत, त्यावर आम्ही अधिक लक्ष देणार असल्याची माहिती फडणवीस यांनी पत्र परिषदेत दिली. केंद्रातील काही मंत्री जुलैमध्ये या मिशन अंतर्गत राज्यात दौरे करणार असून, त्यात भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, आदींचा समावेश असेल असे त्यांनी सांगितले.शिवसेनेचे हे मतदारसंघ रडारवरबुलडाणा- प्रतापराव जाधव, हिंगोली- हेमंत पाटील, पालघर- राजेंद्र गावित, कल्याण- श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे, दक्षिण मुंबई- अरविंद सावंत, शिर्डी- सदाशिव लोखंडे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग- विनायक राऊत, कोल्हापूर- संजय मंडलिक, हातकणंगले- धैर्यशील माने. 

- गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेनेची युती होती. राज्यात भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळविला होता. - २०२४ मध्ये राज्यात ४५ जागा जिंकण्याचे ध्येय भाजपने ठेवले आहे. त्यासाठी निवडलेल्या १६ मतदारसंघांपैकी १० मध्ये सध्या शिवसेनेचे खासदार आहेत.

भाजपच्या या नेत्यांवर दिली जबाबदारी बुलडाणा - अनिल बोंडे, हिंगोली - राणा जगजीतसिंग, पालघर - नरेंद्र पवार, कल्याण - संजय केळकर, दक्षिण मध्य मुंबई - प्रसाद लाड, दक्षिण मुंबई - संजय उपाध्याय, शिर्डी - राहुल आहेर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग - आशिष शेलार, कोल्हापूर - सुरेश हळवणकर, हातकणंगले - गोपीचंद पडळकर.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसElectionनिवडणूक