फलटण : ‘शरद पवार पंतप्रधान व्हावेत, असा सल्ला दिलेला मी कार्यकर्ता आहे; मात्र माझे म्हणणे आहे की, आजच्या घडीला पंतप्रधान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस हेच सर्वाधिक स्वीकारार्ह आणि योग्य आहेत. त्यांना मी भाजपचे नेते म्हणून नव्हे, तर एक कर्तव्यदक्ष नेता म्हणून पाहतोय,’ असे वक्तव्य विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.फलटण पालिकेच्या प्रचारात ते बोलत होते. रामराजे म्हणाले, ‘येथील व्यापारी म्हणतात आम्हाला विकास नको, सुरक्षितता हवी. येथील माय-माऊली भगिनींच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यापुढे कोणावर अन्याय झाला, चुकीचे कोणी काय करत असेल, तर हाच रामराजे काळा कोट घालून कोर्टात तुमच्यासाठी उभा राहील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांच्या न्याय बुद्धीवर आणि व्हिजनवरही आमचा विश्वास आहे. परंतु, देवेंद्रजी तुम्ही सातारा जिल्ह्यात जी माणसं हाताशी धरलीत ती तुम्हाला बदनामी शिवाय काही करणार नाहीत.’
महायुतीसाठी प्रचारातदेवेंद्र फडवणीस यांना दिलेला शब्द मी पाळला आहे. खासदारकीला प्रचार केला नाही. आज उघडपणे प्रचारासाठी आलोय ते महायुतीसाठी आलोय. एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना अभय देण्याचा शब्द दिलाय, तो त्यांनी पाळलाय. कार्यकर्ते सुरक्षित राहत आहेत. आता आम्हाला काय हवंय? कार्यकर्त्यांसाठी सर्व काही करत आहे. पूर्वी फलटण शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख होती. आज आत्महत्येचे शहर म्हणून प्रसिद्ध होत आहे. यांनी गावाचं नाव खराब केलं. आठशे वर्षांची संस्कृती संपवली, असा घणाघातही रामराजे यांनी केला.
Web Summary : Ramraje Naik-Nimbalkar stated Devendra Fadnavis is the most acceptable and suitable leader for Prime Minister from Maharashtra. He criticized Fadnavis' associates in Satara district and highlighted the need for security and development in Phaltan, expressing support for the Mahayuti alliance.
Web Summary : रामराजे नाइक-निंबालकर ने कहा कि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र से प्रधानमंत्री पद के लिए सबसे स्वीकार्य और उपयुक्त नेता हैं। उन्होंने सतारा जिले में फडणवीस के सहयोगियों की आलोचना की और फलटण में सुरक्षा और विकास की आवश्यकता पर प्रकाश डालते हुए महायुति गठबंधन के लिए समर्थन व्यक्त किया।