शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

...ही तर लबाड सरकारची लबाडी : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 16:22 IST

केवळ सत्तेचा माल खाण्यासाठी आणि भाजपाला दूर ठेवण्यासाठी विश्वासघात आणि बेईमानी करून राज्यात हे सरकार सत्तारूढ झाले आहे.

आमडीफाटा/धानला (नागपूर)- केवळ सत्तेचा माल खाण्यासाठी आणि भाजपाला दूर ठेवण्यासाठी विश्वासघात आणि बेईमानी करून राज्यात हे सरकार सत्तारूढ झाले आहे. पण जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे सरकार फार काळ चाललेले नाही, हा या देशाचा इतिहास सांगतो, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यातील आमडीफाटा आणि धानला येथील सभांमध्ये बोलताना केले.

निवडणुकांच्या काळामध्ये अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना करीत होती, तर 50 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी करीत होती. पण आता शेतकर्‍यांना कोणतीही मदत देण्यास सपशेल नकार हे सरकार देत आहे. राज्यात आपण काळजीवाहू मुख्यमंत्री असताना 10,000 कोटी रुपये शेतकर्‍यांसाठी मंजूर केले होते. आज शेतकर्‍यांची मोठी फसवणूक होते आहे. आज पुन्हा नागपूर आणि परिसरात गारपीट झाली आहे. त्यांनाही मदत दिली पाहिजे. एकीकडे अवकाळीग्रस्तांना मदत मिळत नसताना दुसरीकडे फसव्या जाहिरातीसारखी कर्जमाफी दिली जात आहे. आमच्या काळात 2001 ते 2017 पासूनचे कर्ज माफ केले गेले. यांच्या सरकारने केवळ दोन वर्षांचे कर्ज माफ केले. सप्टेंबर 2019ची अट टाकून अवकाळीग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवले आणि त्यातही अटी-शर्ती लागू असे सांगून जीआर काढला. ही एका लबाड सरकारने केलेली मोठी लबाडी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

एकीकडे राज्यात मलाईदार खात्यांसाठी भांडाभांडी होत असताना शेती खातं कुणाकडे जावे, यासाठी मात्र कुणीही आग्रही दिसून येत नाही. यातूनच त्यांचे शेतकरीप्रेम दिसून येते. केंद्रातील मोदीजींच्या सरकारने अनेक योजना आणल्या आणि आज त्याचा देशाला लाभ होत आहे. शेतकरी सन्मान निधीसारख्या योजनांमुळे शेतकर्‍यांना मोठा लाभ होत आहे. गेल्या काळात अनेक महत्त्वाची खाती ही विदर्भातील मंत्र्यांकडे होती. चंद्रशेखर बावनकुळे हे उर्जामंत्री असताना केवळ बिल भरले नाही, म्हणून एकाही शेतकर्‍याची वीज कापण्यात आली नाही. कायम शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आपल्या सरकारने काम केले, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस