शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे कागदावरच : निधी मिळूनही खर्चाबाबत अनास्था, राज्यात ३८ टक्केच निधी खर्च!

By अतुल कुलकर्णी | Updated: January 23, 2018 03:49 IST

राज्याच्या अर्थसंकल्पाला २० टक्के कट लावून जेवढे पैसे वित्त विभागाकडून मिळाले तेदेखील पूर्णपणे खर्च करण्यात अनेक विभागांना अपयश आले आहे. परिणामी, राज्याच्या विकास योजना कागदावरच राहिल्या आहेत.

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पाला २० टक्के कट लावून जेवढे पैसे वित्त विभागाकडून मिळाले तेदेखील पूर्णपणे खर्च करण्यात अनेक विभागांना अपयश आले आहे. परिणामी, राज्याच्या विकास योजना कागदावरच राहिल्या आहेत.आर्थिक वर्ष संपण्यास फक्त दोन महिने शिल्लक असताना पाच प्रमुख विभागांनी अद्याप १० टक्के निधीदेखील खर्च केलेला नाही.जलसंपदा विभागाला सर्वाधिक १०,५३२.३०३ कोटी म्हणजे ७६.५३ टक्के निधी मिळाला असताना, या विभागाने १३३२.८२० म्हणजे फक्त ९.६८ टक्केच निधी खर्च केला आहे.राज्यात सर्वत्र खड्डेच खड्डे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मिळालेल्या ११०३७.४८५ कोटी म्हणजे ७१.९६ टक्केनिधीपैकी फक्त १२८८.७२३ कोटी म्हणजे ८.४० टक्केच निधी खर्च केला आहे.फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. येणा-या वर्षात कोणत्या विभागाच्या मागण्या काय आहेत याचा आढावा घेण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून वित्तविभागाने सुरू केले आहे. त्या वेळी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.राज्याचे एकूण बजेट ३,६९,१८५.३१३ कोटी रुपयांचे होते. त्यापैकी २,२७,१०२.८५५ कोटी रुपये वित्तविभागाने त्या त्या विभागांना वर्ग केले. मात्र त्यापैकी आजच्या तारखेपर्यंत फक्त १,४०,६३९.८८ कोटी खर्च झाले आहेत. याचा अर्थ एकूण बजेटच्या फक्त ३८.०९४ टक्केच निधी खर्च झाला आहे.

ज्या विभागांनी निधी देऊनही खर्च केलेला नाही, त्यांचा तातडीने आढावा घेतला जाईल. गेल्या दोन दिवसांपासून आपण रोज चार ते पाच विभागांचा आढावा घेतच आहोत. दिलेला निधी विकासकामांसाठी आहे त्यामुळे तो खर्च झाला नाही, तर त्याची कारणे शोधली जातील व संबंधित मंत्र्यांना त्याबद्दल विचारणा केली जाईल.- सुधीर मुनगंटीवार, वित्त मंत्रीतुम्हाला आमच्यापेक्षा लवकर माहिती मिळते. तरीपण अधिक माहिती घेऊन सांगतो. आमच्याकडे पंतप्रधान आवास योजनेसाठी निधी आला; पण प्रकल्पांना मंजुरीच मिळाली नाही. त्यामुळे निधी खर्च झाला नाही.- प्रकाश मेहता,गृहनिर्माण मंत्रीआम्हाला विकासकामासाठी ४७५८ कोटी मिळाले. त्यापैकी १९९८ कोटी खर्च झाले आहेत. उद्या आपण विभागाची आढावा बैठक घेणार आहोत. आम्ही खड्डे बुजवण्यासाठी जवळपास १६०० कोटी खर्च केले आहेत.- चंद्रकांत पाटील,बांधकाम मंत्रीआम्ही महामंडळनिहाय खर्च करतो. त्यामुळे आमचा खर्च बिम्स प्रणालीवर दिसत नाही. आम्हाला १०,५३२.३२ कोटी मिळाले होते. त्यापैकी आम्ही ८५५९.६४ कोटी खर्च केले आहेत.- गिरीश महाजन, जलसंपदा मंत्रीएवढे पैसे आमच्या विभागाला दिले हे मी पहिल्यांदाच ऐकले. आम्ही नमामि चंद्रभागेसाठी निधी दिला; व १५ कोटींची टेंडर येत्या आठ दिवसांत निघतील. आम्हाला बजेटमध्ये खूप पैसे सांगतात, मिळत मात्र काहीच नाही.- रामदास कदम, पर्यावरण मंत्री