शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचा ‘पीपीपी’ने विकास

By admin | Updated: March 17, 2015 01:04 IST

रेल्वे - राज्य सरकारच्या संयुक्त माध्यमातून पीपीपी मॉडेलच्या आधारे जलदगतीने पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदार विजय दर्डा यांना दिले.

रेल्वेमंत्र्यांचे दर्डा यांना आश्वासन : ‘रेल्वे म्युझियम-रेल्वे उद्यान’ मार्गीनवी दिल्ली : विदर्भ - मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग रेल्वे - राज्य सरकारच्या संयुक्त माध्यमातून पीपीपी मॉडेलच्या आधारे जलदगतीने पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदार विजय दर्डा यांना दिले. रेल्वेमंत्री प्रभू यांची खा. दर्डा यांनी सोमवारी संसद भवनात भेट घेतली. त्यात वर्धा-यवतमाळ-नांदेड व यवतमाळातील २२ एकर परिसरात ‘रेल्वे म्युझियमसह - रेल्वे उद्यान’निर्मितीच्या प्रगतीबाबत चर्चा झाली. प्रभू यांनी ग्रामीण भागातील रेल्वेचे जाळे मजबूत करण्याचे आश्वासन दर्डा यांना दिले. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग दोन प्रादेशिक विभागांना जोडणारा असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ- मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने या रेल्वेमार्गाला प्राधान्य दिल्याचे तसेच त्यापूर्वी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मार्गाचा प्राधान्यक्रम निश्चित केला होता, असे खा. दर्डा यांनी सांगितले तेव्हा, जलदगतीने हा मार्ग पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रभू यांनी दिली. खा. दर्डा यांनी या रेल्वेमार्गासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दलही कल्पना देताना रेल्वेमंत्र्यांना सांगितले, यवतमाळ हा आदिवासीबहुल मागास जिल्हा आहे. हा मार्ग पूर्ण झाला तर विदर्भ व मराठवाड्यातील अर्थकारणाला चालना मिळेल. पण आताच्या गतीने निधी मिळाला तर अजून १०८ वर्षे हा मार्ग होणार नाही अशी चिंता खा. दर्डा यांनी व्यक्त केली, तेव्हा प्रभू यांनीही यामध्ये गंभीरपणे लक्ष घालू असे मत व्यक्त केले. यवतमाळातील २२ एकर परिसरात ‘रेल्वे म्युझियमसह - रेल्वे उद्यान’ हा इको उद्यान प्रकल्प शक्य तेवढ्या गतीने पूर्णत्वास नेण्याच्या सूचना प्रभू यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. या उद्यानाचे भूमिपूजन माजी रेल्वेमंत्र्यांनी २०१४मध्ये केले. खा. दर्डा म्हणाले, मंत्री बदलले तरी धोरण बदलू नये. किंबहुना उद्यान विकसित करण्यासाठी डब्लूसीएलचे अध्यक्ष राजीव रंजन मिश्रा यांच्याशी चर्चा झाली असून, खासदार निधीतून १ कोटी देण्याची तयारी दर्डा यांनी दर्शविली. या जागेवरील अतिक्रमणे दोन वेळा काढली, असे सांगून रेल्वे बोर्डाच्या अभियांत्रिकी विभागाचे सदस्य सुबोध जैन यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई येथील महाव्यवस्थापकांशी याबाबत पत्रव्यवहारही केल्याचे दर्डा यांनी सांगताच प्रभू यांनी विनाविलंब उद्यान मार्गी लागेल अशी हमी दिली. (विशेष प्रतिनिधी)रेल्वेमंत्र्यांना निमंत्रणरेल्वे व अभियांत्रिकी यांचा विलक्षण संबंध लक्षात घेऊन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथे व्याख्यानासाठी खा. दर्डा यांनी निमंत्रित केले असून, या विनंतीला प्रभू यांनी होकार दिला आहे.