शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दापचरीत पर्यटनाचा विकास करणार - महादेव जानकर

By admin | Updated: November 8, 2016 02:06 IST

महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दापचरी येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

सुरेश काटे , तलासरीमहाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दापचरी येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व त्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन ही दिले. निसर्गरम्य दापचरीतील पर्यटनाला मोठा वाव असून त्यादृष्टीने आपण त्याचा विकास करू , अशी ग्वाही देखील दिली.जिल्ह्यातील दापचरी येथे दुग्धविकास प्रकल्पाच्या हजारो एकर पडिक असलेल्या जागेची त्यांनी पाहणी केली . १९६३ साली दापचरी येथे आदिवासींची २६०० हेक्टर जमीन हस्तांतरित करुन घेऊन मुंबई ठाण्याला मुबलक आणि चांगले दूध मिळावे म्हणून करोडो रूपये खर्च करुन डेअरीचा प्रकल्प उभारला. मात्र काही वर्षात त्याला उतरती कळा लागली. त्यानंतर ही शासकीय सहा ते सात हजार एकर जागा तसेच उभारण्यात आलेला दुग्धविकास प्रकल्प आणि त्यासाठी लागणारी महागडी सामग्री धूळखात पडली आहे. या संदर्भात आज त्यांनी ही पाहणी केली. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हा प्रकल्प पुन्हा उभा कसा करता येईल यादृष्टीने उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या दुग्धविकास प्रकल्पात कोणाचे अतिक्रमण असल्यास ते कितीही बडे नेते असले तरी ते उठवले जाईल अशी ग्वाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील जागा म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असून मी तिचा विकास करणार, राज्याचे उत्पन्न वाढविणार असे ते म्हणाले. दापचरी प्रकल्पातील कृषिक्षेत्राचे सन १९७४-७५ मध्ये करारनामे करून घेऊन भाडेपट्टीवर भूखंडांचे वाटप करण्यात आले. शेतीसाठी बारमाही पाण्याचे आमिष दाखविल्याने अनेकांनी आपल्या नोकऱ्या, कामधंदे, शेतीवाडी सोडून कृषिक्षेत्र योजनेत भाग घेतला. कृषिक्षेत्र ताब्यात घेण्यापूर्वी जाचक असा करारनामा करून एक हेक्टर क्षेत्र, दोन खणी घर (सुमारे १८० चौ, फूट) बारागायी साठी गोठा इतके क्षेत्र प्रत्येकाला वाटप करण्यात आले. मात्र वाटप केलेले क्षेत्र पूर्णपणे विकसित नव्हते. तसेच शेतीसाठी पाण्याची सोय नसतांना देखील दापचरी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेतून १२ संकरित गायी खरेदी करण्यासाठी प्रत्येकी सुमारे ३६ हजार इतके कर्ज मंजूर केले. बंगलोर येथून गायी खरेदी करून देण्यात आल्या. दुधाचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चांलविणाऱ्यांची फसवणूक केली गेली. शेतीला वेळेत पाणी उपलब्ध झाले नाही व गायींना दापचरीचे हवामानही मानवले नसल्याने अपेक्षित दुध उत्पादन मिळाले नाही. पशुवैद्यकीय सुविधा न मिळाल्याने अनेक गाई मृत्युमुखी पडल्या. त्यांच्या विम्याची भरपाईसुद्धा झाली नाही. सन अशा विविध मागण्या यावेळी त्यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कृषिक्षेत्र धारकांनी १९७४ ते १९७८ या कालावधीत २० लाख ८५ हजार लिटर इतक्या दुधाचा पुरवठा शासनाला केला आहे. हे पाहता समस्या दूर झाल्या तर येथील दुग्धव्यावसायिक चांगली प्रगती करू शकतील, हे सिद्ध झाले आहे. असेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.