शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डेअरीसाठी ऊर्जेच्या पुनर्वापराचे तंत्र विकसित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2017 02:25 IST

केआयटी कॉलेजमधील मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. एस. एम. पिसे यांनी दूध शीतकरणातील ऊर्जेच्या पुनर्वापराचे तंत्र (हीट एक्स्चेंजर) विकसित केले आहे.

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केआयटी कॉलेजमधील मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. एस. एम. पिसे यांनी दूध शीतकरणातील ऊर्जेच्या पुनर्वापराचे तंत्र (हीट एक्स्चेंजर) विकसित केले आहे. यामुळे दूध शीतकरणासाठी लागणाऱ्या विजेची ५० टक्के बचत होणार आहे. दूध शीतकरणासाठी सध्या ग्रामीण भागात दूध संकलन केंद्रामध्ये ‘बल्क मिल्क कूलर’ हे शीतकरणीय यंत्र वापरले जाते. त्या ठिकाणी थंड झालेले दूध संघामध्ये पुढील प्रक्रियेसाठी टँकरने आणले जाते. ग्रामीण भागातील संकलन केंद्रामध्ये गरजेनुसार एक हजार ते पाच हजार लीटर क्षमतेचे मिल्क कूलर्स वापरले जातात. थंड केलेले दूध संघात पाठविल्यानंतर, शीतकरण केंद्रातील दूध थंड करण्यासाठी वापरली जाणारी सर्व उपकरणे, दूध थंड करणारा टँक, दूध संकलन केलेली जागा ही पुढील वापरापूर्वी गरम पाण्याने स्वच्छ करणे गरजेचे असते. यासाठी लागणारे पाणी गरम करण्यासाठी सध्या व्यावसायिक गॅस गिझर अथवा विद्युत हिटर्सचा वापर केला जातो. ३५ अंश सेल्सिअस तापमानापासून ४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत १००० लीटर दूध थंड करण्यासाठी, सुमारे १८ युनिट्स इतकी वीज लागते. याशिवाय दुधाची भांडी, इतर उपकरणे स्वच्छ, निर्जंतुक करण्याकरिता पुन्हा तेवढीच वीज लागते.प्रा. पिसे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मोठे दूध प्रकल्प आणि विविध दूध शीतकरण केंद्रांना भेटी देऊन या गोष्टीचा अभ्यास केला. यातील संशोधनातून त्यांनी ‘हीट एक्स्चेंजर’चा उपाय शोधला. या हीट एक्स्चेंजरमुळे कोणताही वाढीव खर्च न करता, एक हजार लीटर दूध शीतकरणाच्या प्रक्रियेमध्ये ६० अंश तापमानाचे ३६० लीटर इतके गरम पाणी तयार होते. या संशोधनातून विद्युत ऊर्जेची ५० टक्क्यांनी बचत होते. दूध प्रक्रिया खर्च कमी होतो.