शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

पोलीस दलातील बंडखोरांचा शोध सुरू

By admin | Updated: January 3, 2015 02:47 IST

नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला बिनतारी संदेश यंत्रणा बंद करण्याबाबत पोलिस दलात शिजलेल्या कटाचा भांडाफोड ‘लोकमत’ने करताच एकच खळबळ उडाली.

औरंगाबाद/मुंबई : नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला बिनतारी संदेश यंत्रणा बंद करण्याबाबत पोलिस दलात शिजलेल्या कटाचा भांडाफोड ‘लोकमत’ने करताच एकच खळबळ उडाली. या बंडात कोण कोण सहभागी होणार होते, याचा शोध गृहमंत्रालयाने सुरू केला असून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईही होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पोलीस दलाच्या वायरलेस विभागातील काही कर्मचाऱ्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली बंड पुकारण्याचा कट आखला होता. नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला ते वायरलेस यंत्रणा ठप्प करणार होते. मात्र, याची कुणकूण वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागताच त्यांनी तात्काळ पर्यायी व्यवस्था उभारल्याने ‘तो’ कट उधळला गेला. दरम्यान, पोलिस शिपायांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर हे ‘पोलीस कर्मचारी संघटन’ नावाची संघटना स्थापन करत असून या संघटनेच्या नोंदणीसाठी त्यांनी धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज केला आहे. याच संघटनेच्या माध्यमातून ३१ डिसेंबरच्या रात्री बिनतारी संदेश वहन यंत्रणा बंद पाडून आंदोलन करण्यात येणार होते, असा दावा तिरोडकर यांनी केला आहे. ‘लोकमत’शी बोलताना तिरोडकर म्हणाले, पोलिस दलाची शिस्त न मोडता आयपीएस असोसिएशनच्या धरतीवर ही संघटना काम करणार आहे. मुंबई, औरंगाबाद आणि नाशिकमधून संघटनेला मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे दीडशे अधिकारी-कर्मचारी सोबत आले आहेत. संघटनेच्या माध्यमातून संप करता येणार नाही, पण निषेध नोंदविण्यासाठी जी कृती शक्य असेल ती करणार, असा दावाही तिरोडकर यांनी केला. (प्रतिनिधी)दोनेक आठवड्यांपासून तिरोडकर यांच्या नावाने पोलीस दलात ३१ डिसेंबरच्या आंदोलनाबाबतचा एसएमएस फिरत होता. पोलीस कर्मचारी संघटनेबाबतची माहिती जास्तीत जास्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हेतू त्यामागे असावा. मात्र आता तो मेसेज तात्काळ डिलीट करून टाकावा, असा आदेश पोलिस शिपायांना देण्यात आल्याचे समजते.३१ डिसेंबरला एक मिनिटासाठी वायरलेस सेटअप बंद पाडून आंदोलन करणार, याबाबतची आगाऊ माहिती राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना दिल्याचा दावा तिरोडकर यांनी केला आहे. याबाबत दयाळ यांना विचारले असता त्यांनी पोलीस कर्मचारी संघटन, त्यांच्याकडून होणारे संभाव्य आंदोलन याबाबत माहिती नाही, अशी प्रतिक्रिया लोकमतकडे व्यक्त केली.